डॉ. लहाडेंच्या कोठडीत पुन्हा वाढ

0
नाशिक | दि. १४ प्रतिनिधी – अवैध गर्भपात प्रकरणी अटकेत असलेल्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वर्षा लहाडे यांचा पोलीस तपासात असहकार सुरूच असल्याने न्यायालयाने लहाडेंच्या पोलीस कोठडीत पुन्हा एक दिवसाची वाढ केली आहे.

डॉ. लहाडे तपासात कसल्याही स्वरुपाचे सहकार्य करत नसल्यानेे कालच न्यायालयाने एक दिवसाची कोठडी वाढवली होती. यामुळे त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. शासकीय सेवेत कार्यरत असतानाही खासगी रुग्णालय थाटल्याप्रकरणी अटकेत असलेल्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वर्षा लहाडे यांना म्हसरूळ पोलिसांनी अटक केली आहे.

मात्र त्या तपासात सहकार्य करत नसल्याने तपास खोळंबला आहे. खासगी रुग्णालय थाटण्यासाठी शासनाकडे सादर केलेली बनावट कागदपत्रे, रुग्णालयातील गर्भपाताची औषधे कोठून आणली, सोनोग्राफीसाठी लागणारे मशीन कुठे आहे? याचा तपास म्हसरूळ पोलिसांना करावयाचा आहे.

मात्र डॉ. लहाडे या तपासात सहकार्य करत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे न्यायालयाने डॉ. लहाडेंच्या पोलीस कोठडीत एक दिवसाची पुन्हा वाढ केली आहे.

LEAVE A REPLY

*