पाथर्डी : महामानवाला अभिवादन

0
पाथर्डी (प्रतिनिधी) – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पाथर्डी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला नगरसेवक प्रविण राजगुरू यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी आरपीआय (आठवले गट) चे तालुकाध्यक्ष बाबा राजगुरू, सामाजिक कार्यकर्ते नाना पगारे, सुभाष पगारे, सुंदर कांबळे, राजु भोसले, विजय काळोखे, श्रीकांत काळोखे, महेश अंगरखे यांच्यासह विविध कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात नगरसेवक प्रवीण राजगुरू म्हणाले, तालुक्यात आमदार मोनिका राजळे यांच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळ गतीमान केली जात आहे.
शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी त्यांनी 30 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने स्मारकाचे काम लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी मोठ्या संख्येने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

*