जिल्हा नियोजन समिती निवडणूक ; 22 इच्छुकांनी नेले 84 अर्ज

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – अहमदनगर जिल्हा नियोजन समिती, ग्रामीण निर्वाचन क्षेत्र आणि संकमणकालीन निर्वाचन क्षेत्रामधून निवडून द्यावयाच्या 36 सदस्यांच्या पोट निवडणुकीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल झाले नसलेती 22 इच्छुकांनी 84 उमेदवारी अर्ज नेले आहेत.
या निवडणुकीकरिता 4 ऑगस्ट 2017 या कालावधीमध्ये नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात येणार आहे,असे अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी भानुदास पालवे यांनी सांगितले.

दिनांक 1 ऑगस्ट 2017 रोजी पासून नामनिर्देशनपत्र स्विकारण्यासाठीची प्रक्रिया सुरू झालेली असून, नामनिर्देशन पत्रे स्विकारण्यासाठी निर्वाचन क्षेत्रनिहाय ग्रामीण निर्वाचन क्षेत्र – श्रीमती. ज्योती कावरे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, अहमदनगर, लहान नागरी निर्वाचन क्षेत्र (नगरपालिका/नगरपरिषद) – शाहूराज मोरे, उपजिल्हाधिकारी, भूसंपादन कार्यालय क्र.14, अहमदनगर व संक्रमणकालीन निर्वाचन क्षेत्र ( नगरपंचायत )- संदीप निचित, जिल्हा पुरवठा अधिकारी, अहमदनगर यांची सहायक निर्वाचन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच या निवडणुकीकरीता आर.बी.थोटे (तहसिलदार, पुर्नवसन, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर) यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. अहमदनगर जिल्हा नियोजन समिती ग्रामीण निर्वाचन क्षेत्र, लहान नागरी निर्वाचन क्षेत्र तथा नगरपालिका/ नगरपरिषद, संक्रमणकालीन निर्वाचन क्षेत्र तथा नगरपंचायत निवडणूक 2017 करीता नामनिर्देशन पत्र स्विकारण्याची प्रक्रिया दिनांक 4 ऑगस्ट 2017 रोजी दुपारी 3वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

दिनांक 1 ऑगस्ट 2017 रोजी अहमदनगर जिल्हा नियोजन समिती निवडणूक-2017 करीता नामनिर्देशन पत्रांबाबतचा निर्वाचन क्षेत्र निहाय ग्रामीण निर्वाचन क्षेत्रात 19 व्यक्तींनी (76 नामनिर्देशन पत्रांची संख्या), लहान नागरी निर्वाचन क्षेत्रात 02 व्यक्तींनी ( 05 नामनिर्देशन पत्रांची संख्या) व संक्रमणकालीन निर्वाचन क्षेत्रात 01 व्यक्तींनी (03 नामनिर्देशन पत्रांची संख्या) नामनिर्देशन पत्र प्राप्त करुन घेतले आहेत. तसेच प्रशासनाकडे आज दाखल करण्यात आलेल्या नामनिर्देशन पत्रांची संख्या निरंक आहे.

LEAVE A REPLY

*