जिल्ह्यात ठिकठिकाणी ईद व इफ्तार पार्टी

0

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक : ससाणे

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – श्रीरामपूर शहर व तालुका काँग्रेसच्यावतीने शनिवार दि. 24 जून रोजी मुस्लीम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, माजी आमदार जयंतराव ससाणे यांनी सर्व मुस्लीम बांधवांंना ईदच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, गेल्या 30 वर्षांपूर्वी स्व. राजनभाई भल्ला यांनी हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक म्हणून इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. ती परंपरा आजपावेतो सुरू आहे व यापुढेही ही परंपरा अशीच सुरू राहील.
या इफ्तार पार्टीसाठी मौलाना इमदादअली, ट्रस्टचे शकूरभाई, करीम मामू, तालुकाध्यक्ष सचिन गुजर, माजी नगराध्यक्षा सौ. राजश्रीताई ससाणे, ज्येष्ठ नेते जलिलभाई पठाण, पक्षप्रतोद संजय फंड, नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, मुजफ्फर शेख, उपनगराध्यक्ष करण ससाणे, मनोज लबडे, मुक्तार शाह, नगरसेविका भारतीताई परदेशी, बाबासाहेब दिघे, ज्ञानेश्‍वर मुरकुटे, भाऊसाहेब डोळस, अण्णासाहेब डावखर, संजय छल्लारे, आशिष धनवटे, मुन्ना पठाण, रितेश रोटे, लक्ष्मण कुमावत, सुनील क्षीरसागर, संगीताताई मंडलिक, स्वातीताई छल्लारे, सुनंदाताई जगधने, अ‍ॅड. विजय बनकर, मुख्याधिकारी सुमंत मोरे,
डॉ. प्रशांत चव्हाण, डॉ. रवींद्र कुटे, अ‍ॅड. समीन बागवान, आसिफ दारुवाला, रियाजखान पठाण, अशोक उपाध्ये, हाजी जावेदभाई बागवान, गफ्फार पोपटिया, जावेदभाई शेख, युनूस पटेल, नझीरभाई टेम्पोवाले, अबुबकर कुरेशी, मेहबुबभाई कुरेशी, शाहीद कुरेशी, मुसा कुरेशी, महंमद रफीक, बंडूभाई चौधरी, इब्राहीम कुरेशी, सलीमभाई टर्नर, हरुण मेमन, इसाकभाई आतार, मास्टर सरवरअली, अस्लम कुरेशी, परवेझ कुरेशी, मेहबूब कुरेशी,
अश्पाक शेख, सोहेल दारुवाला, युसूफ लखानी, दगडूभाई सय्यद, शरीफ शेख, रशीद खान, हमीद चौधरी, दिलावर पेंटर, जमीरभाई शाह, अमीर बेग मिर्झा, जमीर मन्सुरी, अनिल इंगळे, शंकरराव फरगडे, सुभाष तोरणे, गणेश मगर, विलास पुंड, प्रविण हारदे, बिबवे अण्णा, कैलास दुबैय्या, प्रेमचंद कुंकूलोळ, त्रिभूवन दादा, भानुदास पवार, रविंद्र झरेकर, बंडू उंडे, बडदे सर, दानिश शेख, गणेश नाईक,
सलीम शेख, शफी शाह, युवक काँग्रेसचे विशाल दुपाटी, तेजस बोरावके, कृष्णा पुंड, पंजाबराव भोसले, प्रतिक बोरावके, चिरायू नगरकर, अ‍ॅड. युवराज फंड, निलेश नागले, अजिंक्य नागरे, अमोल शेटे, राहुल बागुल, राजेश जोंधळे, निलेश कुंकूलोळ, जुबेर दारुवाला, गोपाल लिंगायत, साहिल ससाणे, नरेंद्र कुर्‍हे, सुलतान जहागिरदार, दीपक कदम, बापू गारुडकर, सागर दुपाटी, सुनील जगताप, सुमित आहेर,
प्रताप गुजर, शुभम हरदास, गजानन यशवंत, महेश औटी, सुहास परदेशी, सुरेश ठुबे, आबिद शेख, वसीम पिरजादे, फिरोज पठाण, बब्बू शेख, मनिष पंचमुख, शाहरुख पठाण, सनी खांदे, हिमांशू गिरमे, सतीश पाटणी, सचिन भोसले, अजय गिरमे, सचिन भुजबळ, रवि सनानसे, जयराम रजपूत, टिलू मुरुमकर आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी नगरसेवक मुजफ्फर शेख, मुक्तार शाह, मुन्ना पठाण, मेहबूब कुरेशी, रियाज पठाण, जावेद शेख, आसिफ दारुवाला, शाहेद कुरेशी, अ‍ॅड. समीन बागवान यांनी परिश्रम घेतले.

सर्वधर्मीय एकच : जिल्हाधिकारी महाजन
अहमदनगर (प्रतिनिधी) – महिनाभराच्या उपासनेनंतर ईदचा हा दिवस मुस्लीम बांधव आनंदाने साजरा करत असतात. जवळच्या व्यक्तींना आपुलकीने बोलवून आपल्या आनंदात त्यांनाही सहभागी केले जाते. ईद मीलनच्या कार्यक्रमाद्वारे स्नेहभाव जपला जातो. तुम्ही आमचे आहात व आपण सर्व धर्मीय एकच असल्याचे सांगून, जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. नगरमध्ये रमाजान ईदनिमित्त हाजी अजीजभाई चष्मावाला मार्ग, झेंडीगेट येथे ईद मीलनचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी महाजन बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी गोपीचंद कदम, तहसीलदार सुधीर पाटील, कोतवालीचे पो. नि. अभय परमार, मराठी पत्रकार परिषदेच्या नाशिक विभागीय सचिव मीनाताई मुनोत, प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख, सामाजिक कार्यकर्ते राजाराम भापकर गुरुजी आदि उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत मन्सूर शेख यांनी केले. प्रास्ताविक विजयसिंह होलम यांनी केले. महेश देशपांडे महाराज यांनी सूत्रसंचलन केले. महेश पटारे यांनी आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने विविध क्षेत्रांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शिर्डी (प्रतिनिधी)- रमजान ईद निमित्त राज्याचे विरोधी पक्षनेते ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीतील ईदगहा मैदानावर जाऊन मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. ईद निमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून आले.
ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी मौलाना मन्सूर यांच्या मार्गदर्शनाखाली नमाज पठण केले. विवाह सोहळ्याच्या माध्यमातून जातीय सलोखा राखण्याचे काम करणारे प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते यांचा मुस्लिम समाज्याच्या वतीने मौलाना असगरअली, नगरसेवक हाजी बिलाल शेख, जमादार इनामदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ईदगाह मैदानाचे दोन दिवसांपूर्वी नगरपंचायत वतीने साफसफाई करण्यात आली. ईद निमित्त सर्व पक्ष नेत्यांनी ठिकठिकाणी शुभेच्छा फलक लावले होते.नमाज नंतर मुस्लिम बांधवाना शुभेच्छा देण्यासाठी प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते, उपनगराध्यक्ष जगन्नाथ गोंदकर, नगरसेवक अभय शेळके, अशोक गोंदकर, सचिन कोते, दत्तात्रय कोते, ताराचंद कोते, मंगेश त्रिभुवन, माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते, अनिल शेजवळ, गोपीनाथ गोंदकर, सामाजिक कार्यकर्ते पोपटराव शिंदे, रविंद्र गोंदकर, गणेशचे संचालक मधुकर कोते आदी मान्यवर उपस्थित होते.

पाडळी रांजणगाव (वार्ताहर) – नारायणगव्हाण येथे मुस्लिम बांधवांनी सकाळी 9 वाजता रमजानईदनिमित्त सामूहिक नमाज अदा केली. त्यानंतर एकमेकांना शुभेच्छा देत उत्साहात रमजान ईद साजरी केली.
रमजान ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना सरपंच सुरेश बोरूडे, गणेश कोहकडे, विष्णूपंत दरेकर, मंगेश शेळके, सौरभ भोसले, तारा दरेकर, पत्रकार दीपक करंजुले यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी सरपंच सुरेश बोरूडे म्हणाले की, नागरिकांनी प्रत्येकाच्या धर्माचा आदर करून बंधू भावाने आनंदमय जीवन जगावे, जात, पात काही नसून माणूस ही एकच जात आहे. सर्वांचा आदर करून जीवन जगल्यास सुखी जीवनाचा आनंद अधिक घेता येईल. राग, लोभ, मत्सर न ठेवता प्रत्येकाने आदर भावाने एकमेकांना प्रतिष्ठा दिल्यास जीवन सुखी होईल, असे विचार मांडले.
यावेळी मौलाना मुजाफ्फर अन्सारी शिवसेना शाखाप्रमुख हुसेन शेख, हसन शेख, बाबुद्दीन शेख, लतिफभाई शेख, नादर शेख, नूरमहमद शेख, अजीम शेख, बाबूलाल शेख, सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस एम.आर आडकित्ते यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

कर्जत (प्रतिनिधी) – रमजानचा रोजा हे भक्तिसह तन,मन शुद्धी आणि शक्तीचे प्रतिक आहे असे प्रतिपादन कर्जत उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांनी केले आहे.
कर्जत पोलीस ठाण्यात रमजाननिमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन कर्जतचे पोलीस निरीक्षक वसंत भोये यांनी केले होते. यावेळी श्री.मुंढे हे बोलत होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद भिंगारे, पोलीस हेडकॉन्स्टेबल दादासाहेब भापकर, मौलाना अखलाख अहमद, तय्यब पठाण, नगरसेवक तारेक सय्यद, सचीन सोनमाळी, अमृत कालदाते, गणेश क्षीरसागर, रज्ज़ाक झारेकरी, शब्बीर पठाण, ईल्लुभाई पठाण, जाहिद सय्यद, लतीफ़ पठाण, फिरोज पठाण, मुस्ताक सय्यद, पोलीस नाईक बबन पवार, भाऊसाहेब कुरुंद, पोलीस कॉन्स्टेबल मनोज लातुरकर, अनमोल चन्ने यांच्यासह मुस्लिम बांधव उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.दीपक लांगोरे तर तारेक सय्यद यांनी आभार मानले.

चांदा (वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील चांदा व परिसरात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांना हिंदू बांधवांच्यावतीने गुलाबपुष्प, मिठाई व शुभेच्छा देत ऐक्याचे दर्शन या निमित्ताने पहावयास मिळाले
रमजान ईदच्या आदल्या दिवशी माजी सभापती कारभारी जावळे, माजी पंचायत समिती सदस्य अनिल अडसुरे, प्रभारी सरपंच संजय भगत, विजय रक्ताटे, माजी सरपंच डॉ. विकास दहातोंडे, बाळासाहेब जावळे, मुळाचे संचालक बाबुराव चौधरी, भेंडा कारखान्याचे संचालक मोहनराव भगत आदी प्रमुख मान्यवरांनी मुस्लिम बांधवाना मस्जिदमध्ये इफ्तार पार्टी दिली होती. माजी आमदार शंकरराव गडाख मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. सकाळी नऊ वाजता रमजानची नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधवांच्या स्वागतासाठी मोठमोठे बॅनर लावण्यात आले होते. नमाज अदा करून आलेल्या बांधवांना गुलाबपुष्प व मिठाईचे पाकिटे वाटण्यात आली. त्यासाठी मोठा स्टॉल लावण्यात आला होता. त्याठिकाणी माजी पंचायत समिती सदस्य अनिलराव अडसुरे, माजी सरपंच डॉ. विकास दहातोंडे, प्रभारी सरपंच संजय भगत, विजय रक्ताटे, चांगदेव पुंड, चंद्रकांत जावळे, अ‍ॅड. समीर शेख, सादिक शेख, माधवराव दहातोंडे, अकिल शेख, शिवाजी चौधरी, राजेंद्र दहातोंडे, संजय दहातोंडे, बाळासाहेब जावळे, संभाजी चौधरी आदींनी स्वागत केले.

भानसहिवरा (वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथील कब्रस्थान मस्जीदमध्ये रमजान ईद निमित्त इफ्तार पार्टी पार पडली. याठिकाणी अनेक वर्षांपासून हिन्दू मुस्लिम समाज एकत्रित असून दोन्ही समाजाचे सण एकत्रित येऊन पार पाडण्याची परंपरा आहे.
आ.बाळासाहेब मुरकुटे, भाजपा युमोचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण मोहिटे, जाकीर शेख व क्रांतिकारी पक्षाचे पंचायत समिती सदस्य किशोर जोजार यांच्याकडून गावातील मुस्लीम बांधवाना रमजान महिन्याच्या उपवसानिमित्त वेगवेगळ्या दिवशी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले तर सावता प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक पेहरकर यांच्याकडून रोख स्वरुपात देणगी देण्यात आली.
यावेळी कब्रस्तानचे मौलाना हाफिज असीफ शेख व मौलाना अश्पाक शेख, राजु पटेल, डॉ. भोगे, जाकीर शेख, अ‍ॅड. संजय लवाडे, प्यारेलाल मुनोत, भगवानराव जाधव, तुकाराम काळे आदींची मनोगतपर भाषणे झाली. मुस्लिम बांधवाना रमजानच्या उपवासानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी धनेश मुनोत, प्रकाश वंजारे, संजय तुपे, प्रविण वंजारे, बाळासाहेब भणगे, जनार्धन जाधव, बाबासाहेब ढवाण, शिमोन मकासरे, बबन भणगे, नंदू जाधव, बाळासाहेब पेहरे, अशोक पेहरकर, आशिष वंजारे, पोपट शेकडे, सराजी ढवाण, अशोक टेकणे, अभिषेक पटारे, बाबा पटारे आदी उपस्थित होते.

नेवासा (तालुका प्रतिनिधी)- जातीय सलोखा अंतर्गत नेवासा पोलीस स्टेशनच्यावतीने नेवासा येथील जामा मस्जीदमध्ये शनिवार 24 जून रोजी सायंकाळी आयोजित ईफ्तार पार्टीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ईफ्तार पार्टीसारखा उपक्रम जातीय सलोखा वृध्दिंगत करणारा असल्याचे प्रतिपादन शेवगाव विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिजित शिवथरे यांनी यावेळी केले.
यावेळी पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे, मौलाना हाफिज मोहसीन, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, नगरसेवक सुनील वाघ, अ‍ॅड. बापूसाहेब गायके, संजय सुखदान, अल्ताफ पठाण, राजेंद्र मापारी, संदीप बेहळे, सचिन वडागळे, भाऊसाहेब वाघ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गफूर बागवान, फारुक दारूवाले, जैन श्रावक संघाचे सतीश चुत्तर, भाजप व्यापारी सेलचे अध्यक्ष राजेंद्र मुथ्था, बाळासाहेब कोकणे, महेश मापारी, रिपाइंचे अध्यक्ष नितीन मिरपगार, शिवा जंगले, गणेश कोरेकर, विशाल सुरडे, सतीश चक्रनारायण, दीपक सोनवणे, प्रवीण सरोदे, हारुण जहागीरदार उपस्थित होते. सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर बाबा लबडे यांनी आभार मानले.

शिर्डी (प्रतिनिधी)– रमजानचा महिना पवित्र व सुख, शांतीचा यांचा संदेश देणारा महिना असून यानिमित्ताने मुस्लिम बांधव जे उपवास करतात त्यामुळे आत्मशुद्धी होते, अशी भावना मुस्लीम बांधवांशी बोलताना नगराध्यक्ष सौ. ममता पिपाडा यांनी व्यक्त केली व सर्व मुस्लीम बांधवांना रमजानच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.
राहाता जामा मस्जिद येथे नगराध्यक्षा सौ. ममता पिपाडा यांनी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी डॉ. राजेंद्र पिपाडा, धनंजय गाडेकर, भाजपा शहराध्यक्ष सचिन भणगे, प्रशांत दंडवते, दिलीप वाघमारे, नगरसेविका सौ. मंगला गाडेकर, नगरसेविका सौ. विमलताई आरणे, सौ. निलम सोळंकी, बाळासाहेब गिधाड, दीपक सोळंकी, गोरख पवार, योसेफ बनसोडे, शिवाजी आनप, शुक्लेश्वर शेळके, कुमावत टेलर, डॉ. गाडेकर तसेच हाजी इकबाल शेख, मुन्ना फिटर, मौलाना इब्राईम, युनूसभाई पठाण, मुस्ताकभाई शहा, अफजलभाई शेख, हाफी सोहेब, अन्सार पठाण, तनवीर शेख आदी मुस्लीम बांधव उपस्थित होते.

कुकाणा (वार्ताहर)- नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे रमजान ईदचा सण उत्साहात साजरा झाला. इस्लाम धर्मामध्ये पवित्र मानल्या जाणार्‍या रमजान महिन्यातील तीस उपवासांची रविवारी चंद्रदर्शनानंतर सांगता झाली. सोमवार 26 जून रोजी सकाळी 9.15 वाजता कुकाणा येथील ईदगाह मैदानात ईद-उल-फित्र ची नमाज हजारो मुस्लीम बांधवांनी पठण केली.
सर्व मुस्लीम बांधव या महिन्यात सदका-खैरात (दान) व अल मालमत्तेच्या हिश्शातून ठरावीक भाग म्हणून जकात देऊन गरिबांना फित्रा (धान्य) देतात. सकाळी 9 वाजल्यापासून ईदगाह येथे कुकाण्यासह अंतरवाली, चिलेखनवाडी, जेवूर, देवसडे, देडगाव, पाथरवाला, तरवडी, देवगाव आदी गावांतील मुस्लीम बांधव नमाजसाठी जमा झाले होते. सुरुवातीला मर्कस मस्जिदचे मौलाना इम्रानसाहब यांनी रमजान महिन्याचे पावित्र्य व महत्त्व यासह मानवता, भाईचारा, एकोपा याविषयी बयान (प्रवचन) केले. जामा मस्जिदचे मौलाना शमशाद साहब यांनी ईदची नमाज पठण केली. तर इम्रान मौलाना यांनी खुदबा पठण करून दुवा मागितली. नंतर सर्व मुस्लीम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत अलिंगन दिले. यावेळी मुस्लीम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी विविध स्तरातील हिंदू बांधव मोठ्या संख्येने हजर होते.

चासनळी (वार्ताहर)- पवित्र रमजान पर्वानिमित्त चासनळीतील सर्वधर्मीयांनी इफ्तार पार्टीचे आयोजन करत एकतेचा संदेश दिला.
संजीवनी कारखान्याचे संचालक मनेष गाडे व कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक सचिन चांदगुडे यांनी रमजान ईद निमित्ताने मुस्लीम बांधवांसाठी ईफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी संचालक मनेष गाडे म्हणाले आपल्या गावात हिंदू मुस्लीम बांधवांचे ऐक्य व सुख दुःखातील सहभाग बर्‍याच दिवसांपासून पाहत आलो आहोत. हे ऐक्य दिवसेंदिवस वाढत जाण्याची गरज आहे. रमजान ईद, बकरी ईद, दिवाळी, गणेशोत्सव या सणांमध्ये सर्व समाज बांधव एकत्र येऊन एकमेकांपप्रती आदर ठेवण्याची गरज आहे. यावेळी सचिन चांदगुडे यांनी फराळाचे वाटप केले. या कार्यक्रमात राहुल चांदगुडे, पोलीस पाटील प्रकाश शिंदे, अरुण चांदगुडे, कैलास माळी, बाबुराव गाडे, युसूफ सय्यद, अनवर सय्यद, अकबरभाई, रफिक पठाण, मुसा शेख, सादीक सय्यद, अकिल सय्यद, इकबालभाई, चाँदभाई आदी मुस्लीम बांधव उपस्थित होते.

संगमनेर (प्रतिनिधी) – भारतीय परंपरा ही विविधतेने नटलेली असून प्रत्येक सण हे एकात्मतेचा व नव आनंद देणारे असतात. पवित्र रमजानच्या उपवसानंतर येणारा रमजान ईद हा सण संपूर्ण विश्‍वाला एकात्मता, बंधुता, शांती व प्रेमाचा संदेश देणारा असल्याचे प्रतिपादन माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केले.
ईदगाह मैदान येथे रमजान ईदनिमित्त मुस्लीम बांधवांना शुभेच्छा देताना ते बोलत होते. यावेळी आ. डॉ. सुधीर तांबे, युवा नेते सत्यजीत तांबे, विश्‍वासराव मुर्तडक, नितीन अभंग, अजय फटांगरे, गजेंद्र अभंंग, गणेश मादास, गुलाबराव ढोले, किशोर टोकसे, किशोर पवार, केशवराव मुर्तडक, शकील पेंटर, लाला बेपारी, बाळासाहेब पवार, लक्ष्मण बर्गे, कन्हैय्या कागडे, शफी तांबोळी, उपविभागीय पोलीस अधिकारी थोरात, पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे, तहसीलदार प्रियंका आंबरे आदी उपस्थित होते.
आ. डॉ. तांबे म्हणाले, विविध संस्कृतींनी नटलेल्या या देशात रमजानमुळे बंधुता वाढत असून संबंध विश्‍वाला मानवता धर्म हा शिकविणारा हा सण आहे. याप्रसंगी लुकड्या पहिलवान, निखिल पापडेजा, सोमेश्‍वर दिवटे, अनिस शेख, गणेश गुंजाळ यांसह शहरातील विविध मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी आ. बाळासाहेब थोरात व आ. डॉ. सुधीर तांबे यांनी सर्व मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

कोपरगाव (प्रतिनिधी) – पवित्र रमजान महिन्यात 30 दिवस मुस्लीम बांधवांचे खडतर व्रत उपासना केल्याने शरीराची शुद्धी तर होतेच त्याचबरोबर पवित्र कुराण ग्रथांचे पठण करून मन व आत्म्याचीही शुद्धी होते असे प्रतिपादन युवा नेते आशुतोष काळे यांनी केले.
कोपरगाव येथील ईदगाह मैदानावर मुस्लीम बांधवाना रमजान ईदच्या शुभेच्छा देताना ते बोलत होते. आशुतोष काळे म्हणाले रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लीम बांधवांनी केलेले व्रत उपासना हे खूप मोठे पुण्य असून रमजान ईद मुस्लीम बांधवांचा पवित्र सण आहे. शुद्ध आचरण व शुद्ध विचारातून रमजान ईदच्या दिवशी मुस्लीम बांधवांनी केलेले सामुदायिक नमाज पठण अल्लाच्या चरणी अर्पण होते. मुस्लीम बांधवांनी ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठण केले. याप्रसंगी आशुतोष काळे यांनी सर्व मुस्लीम बांधवाना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, विजयराव आढाव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक संदीप वर्पे, विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, सुनील शिलेदार, राजेंद्र वाकचौरे, बाळासाहेब रुईकर, मुकुंद इंगळे, राजेंद्र आभाळे, फकीरमामू कुरेशी, राजू बोरावके, गणेश लकारे, इम्तियाज अत्तार, नितीन बनसोडे, नवाज कुरेशी, संतोष टोरपे, बापू वढणे, हारून शेख, रावसाहेब साठे, वाल्मिक लाहिरे, चांदभाई पठाण, रंगनाथ दिवेकर, प्रसाद उदावंत, निखिल डांगे, बाळासाहेब सोनटक्के, योगेश जगताप, राजेंद्र खैरनार, रवी खैरनार, नारायण लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

नेवासा (तालुका प्रतिनिधी) – नेवासा येथे रमजान ईद उत्साहात साजरी झाली. ईदनिमित्त सर्वपक्षीय, सर्वधर्मीय बांधवांनी मुस्लीम बांधवांना ईदच्या गळाभेट घेऊन शुभेच्छा दिल्या. खुपटी रोडवर असलेल्या ईदगाह मैदानावर ईदची नमाज अदा करण्यात आली. यावेळी मौलाना मुहंमद मतलुब मेवाती यांनी खुदबा तर मौलाना हाफिज फारुक यांनी बयान पेश करुन ईदची नमाज अदा केली.
संत तुकाराम महाराज मंदिर चौकात मुस्लीम बांधवांच्या स्वागतासाठी प्रभारी तहसीलदार ज्योतिप्रकाश जायकर, पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे, क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्यावतीने पुणे विद्यापीठ सिनेट सदस्य प्रशांत गडाख, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, रामभाऊ केंदळे, नगरसेवक अ‍ॅड. बापूसाहेब गायके, संदीप बेहळे, लक्ष्मणराव जगताप, सतीश पिंपळे, अभयकुमार गुगळे, महेश मापारी, नितीन दिनकर, भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्‍वर पेचे, निरंजन डहाळे, उद्योजक प्रभाकर शिंदे, नगरसेवक सुनील वाघ, दिनेश व्यवहारे, राजेंद्र मापारी, भारत डोकडे, डॉ. लक्ष्मण खंडाळे, भानसहिवरा येथील सरपंच देविदास साळुंके, बाळासाहेब वरूडे, एकनाथ भगत, डॉ. सचिन सांगळे, मनोज डहाळे, रोहित पवार, दत्तात्रय बर्डे, रणजीत सोनवणे, माजी सरपंच सतीश गायके, निवृत्ती बर्डे, सुनील मोरे, विकास चव्हाण, बापू जामदार, काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष संजय सुखदान, विकास शेटे, राहुल पवार, विष्णू इंगळे यांनी गुलाबपुष्प देऊन तर सुनील जाधव, बाळासाहेब कोकणे, नारायण लोखंडे, दिलीपराव जामदार, विशाल सुरडे यांनी मुस्लीम बांधवांना गुलाबपुष्प व फराळाचे पाकिट देऊन शुभेच्छा दिल्या.
क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या वतीने फराळ पाकिटे देऊन ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. हिंदू बांधव मुस्लीम बांधवांना गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा देतानाचे चित्र शहरातील चौकाचौकांत दिसत होते.

तळेगाव दिघे (वार्ताहर) – संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. हिंदू धर्मीयांनी मुस्लिम बांधवाना शुभेच्छा देत सामाजिक सौहार्दाचा तसेच एकात्मतेचा संदेश दिला.
यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते इसाक शेख, बशीर शेख, मतीन शेख, सर्फराज शेख, सलीम शेख, द्गुभाई शेख, अमजद शेख, मुन्ना शेख, लतिब शेख, नजीर शेख, अन्नू शेख, जावेद पठाण, अनिस शेख, गफूर शेख, मोसिन शेख सहित मुस्लीम कार्यकर्ते उपस्थित होते. माजी जि. प. सदस्य प्रभाकर कांदळकर, पं. स. माजी उपसभापती नामदेवराव दिघे, माजी सरपंच तात्यासाहेब दिघे, सामाजिक कार्यकर्ते मधुकर दिघे, सरपंच प्रमिलाताई जगताप, उपसरपंच बाळासाहेब दिघे, तळेगाव सोसायटीचे अध्यक्ष तुकाराम दिघे, अण्णासाहेब दिघे, सूर्यभान दिघे, विठ्ठल दिघे, लक्ष्मण दिघे, रमेश दिघे, सुरेश दिघे, दादासाहेब दिघे, आत्माराम जगताप, बाबासाहेब कांदळकर, सचिन दिघे, पंढरीनाथ इल्हे, अनिल कांदळकर, अशोक जगताप, भाऊसाहेब दिघे, रावसाहेब जगताप, संतोष दिघे, संपतराव दिघे, सुनील जगताप, अशोक दिघे, गोविंद कांदळकर, संजय दिघे, बाळासाहेब दिघे, नंदकुमार पिंगळे, निवृत्ती दिघे, नवनाथ रहाणे, राहुल जगताप, परसराम नाईनवार, विकास गुरव, बाबा जगताप, बाबासाहेब दिघे, अमरीश रासने, भागवत दिघे, बाबासाहेब दिघे, अमोल दिघे सहित हिंदू बांधवांनी मुस्लिम धर्मीयांना शुभेच्छा दिल्या.

राहुरी स्टेशन (वार्ताहर) – विश्‍वभरात शांतता नांदावी, पाऊस पडावा व सर्वत्र सुजलाम, सुफलता यावी, सर्व जाती-धर्माच्या लोकांमध्ये सलोखा राहावा, राष्ट्रीय एकात्मता वाढावी अशी सामुदायिक प्रार्थना अल्लाहकडे मुस्लीम बांधवांनी केली. राहुरी येथील ईदगाह मैदानावर ईदची नमाज अदा करून राहुरी तालुक्यात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी केली.
राहुरी शहरातील जामा मस्जिद येथून सकाळी 8.30 वाजता सर्व मुस्लिम बांधव शिवाजी चौक, शुक्लेश्‍वर चौक, नगर-मनमाड रोड या पारंपारिक जुलूस मार्गाने एकत्र येऊन नमाज अदा करण्यासाठी अल्लाहाचे नामस्मरण करीत ईदगाह मैदानात पोहचले. ईदगाह मैदानात सुरूवातीला चिस्तिया मस्जिदचे मौलाना असलम यांनी रमजान ईद (ईद-उल फित्र) व रोजाविषयी समर्पक माहिती विशद केली. यावेळी मुस्लीम बांधवांनी जामा मस्जिदीचे मौलाना मुफ्ती अफजल हाफिज यांच्या मार्गदर्शनाखाली ईदच्या नमाजचे पठण केले.
यावेळी आ. शिवाजीराव कर्डिले, बाजार समितीचे सभापती अरूण तनपुरे, तहसीलदार अनिल दौडे, पो.नि. प्रमोद वाघ, माजी उपनगराध्यक्ष आर.आर. तनपुरे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे, नगरसेवक सूर्यकांत भुजाडी, अक्षय तनपुरे, बाळासाहेब उंडे, सुभाष वराळे, योगेश देशमुख, संजय साळवे, पांडूरंग बर्डे, दीपक साळवे आदींनी मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या. नमाज नंतर राजवाडा येथे संजय साळवे व राजावाडा मित्रमंडळाच्या वतीने मुस्लीम बांधवांसाठी सरबत वाटप करण्यात आले.
तालुक्यात राहुरी फॅक्टरी, गुहा, सोनगांव, सात्रळ, कोल्हार, कानडगांव, निंभेरे, बारागांव नांदूर, वांबोरी, उंबरे, ब्राह्मणी, मानोरी, मांजरी, टाकळीमियॉ, लाख, जातप आदी ठिकाणी सामुदायिकरीत्या ईदची नमाज अदा करण्यात आली.
ठिकठिकाणी ईदगाह मैदानावर जि. प. सदस्य शिवाजीराव गाडे, माजी जि.प. अध्यक्ष अरुण कडू, बाबासाहेब भिटे, दादासाहेब सोनवणे, अजित कदम, प्रेरणाचे अध्यक्ष सुरेश वाबळे, साई मल्टिस्टेटचे शिवाजीराव कपाळे, अमृत धुमाळ, नितीन बाफना, अनिल इंगळे, सुभाषराव आढाव, बाबासाहेब भोइटे, अनिल शिरसाठ, अ‍ॅड. भाऊसाहेब पवार, बाळासाहेब पेरणे, ईश्‍वर सुराणा, इंद्रभान पेरणे, दिलीप गोसावी, सुहास कोळपकर, सुनील मुळे, शिवाजी सागर, राजेंद्र बोरकर, सोपानराव हिरगळ, नगरसेवक नितीन तनपुरे, अण्णासाहेब शेटे, डॉ. शरद धावडे, देवंद्र लांबे, राजेंद लबडे, संदीप सोनवणे, अलोक पवार, माजी नगराध्यक्ष अनिल कासार, राजेंद्र उंडे, दिलीप शिरसाठ, सचिन गुलदगड, प्रा. मोहनीराज होन, शरद वांढेकर, अशोक पलघडमल, ना. म. साठे, रिपब्लिकन सेनेचे राजू आढाव, रिपाइंचे बाळासाहेब जाधव आदींनी मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
देवळाली प्रवरा येथे ईदगाह मैदानावर नमाज अदा केल्यानंतर शिर्डी संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, नगराध्यक्ष सत्यजित कदम, उपानगराध्यक्ष प्रकाश संसारे, चैतन्य मिल्कचे अध्यक्ष गणेशराव भांड, बाळासाहेब चव्हाण, अजित कदम, मुरलीधर कदम, जगन्नाथ चव्हाण, रिपाइंचे सुरेंद्र थोरात, राजेंद्र लोंढे, प्रा. सतीश राऊत, नानासाहेब कदम, शहाजी कदम, गोरख मुसमाडे आदींनी मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर शहरात सोमवारी मुस्लीम बांधवांनी ईद मोठ्या उत्साहात साजर केली. शहरातील कोठला मैदानावर मुस्लीम बांधवांनी एकत्रितपणे नमाज अदा केली. देशात शांतता नांदू दे, भरपूर पाऊस पडू दे अशी प्रार्थना यावेळी अल्लाहाकडे करण्यात आली. शहर खतीब मौलाना अहमद यांनी ही दुआ केली. त्यानंतर पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, हरजीत वधवा, जंगम देवा, संजय सपकाळ, उबेद शेख, अ‍ॅड. शिवाजी कराळे, फारूक रंगरेज यांनी गुलाबपुष्प देऊन मुस्लीम बांधवांना शुभेच्या दिल्या.
ईदनिमित्त सुमारे सात हजार मुस्लीम बांधवांनी कोठला मैदानावर तसेच मशिदीत जाऊन नमाज पठण करत केले. नमाज पठण झाल्यानंतर सर्वांनी एकमेकांना अलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या.
यानिमित्त मुस्लिम बांधवांनी मिठाई वाटून ईद मोठ्या उत्साहात साजरी केली. यानिमित्त शहरातील अनेक मशिदींवर विद्युत रोषणाईही करण्यात आली होती. दरम्यान दिवसभर शहरातील मुस्लीम भागात शिरखुरम्याचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील अनेक चौकांत डीजे लावून ईद सणाचा आनंद लुटण्यात येत होता.

सलाबतपूर (वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील पवित्र रमजान ईदच्या निमित्ताने नमाज पठण करून देशात शांतता नांदावी, पर्जन्याची कृपा व्हावी म्हणून मुस्लीम बांधवांनी अल्लाहकडे प्रार्थना केली.
सोमवारी सकाळी सलाबतपूर येथील ईदगाह मैदानावर हजारो मुस्लीम बांधवांनी सामुदायिक नमाजपठण केले. चांगला पाऊस पडावा, शांतता व सुव्यवस्था रहावी यासाठी प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर गावातील छत्रपती चौकात माजी आमदार शंकरराव गडाख मित्रमंडळाच्यावतीने फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी गोगलगाव, खडका, गळनिंब, वाकडी आदी गावांतील मुस्लीम बांधव सामील झाले होते. फराळ वाटपासाठी अजहर शेख, शरीफ शेख, जाऊल शेख, रिजवान शेख, जुनेर शेख, हाजी शायद, कासूभाई शेख, अनिस मौलाना, हाजी इमदाद मौलाना, रफिक शेख, शहनवाज शेख, सलीम पटेल आदी उपस्थित होते. ईदच्या निमित्ताने एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. पोलीस कॉन्स्टेबल कारखिले व पोलीस नाईक श्री. मोढवे यांनी चोख बंदोबस्त बजावला.

शिर्डी (प्रतिनिधी)- रमजान महिना हा मुस्लीम बांधवांसाठी पवित्र महिना असून प्रत्येक बांधवाने जातीय सलोखा व बंधूभाव वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन भाजयुमोचे साईराज कोते यांनी केले.
मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान ईद निमित्त भारतीय जनता युवा मोर्चाचे साईराज रमेश कोते यांच्या वतीने शिर्डी येथील नुरानी मशिदीत ईप्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास सर्व धर्मीय नागरीक उपस्थीत होते. साईराज कोते यांनी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. याप्रसंगी नुरानी मस्जिदचे मौलाना असगरअली यांनी शुभेच्छा स्विकारल्या. यावेळी भाजपा शहराध्यक्ष शिवाजी गोंदकर, गजानन शेर्वेकर, रविंद्र गोंदकर, रमेश कोते, शौकत भाई सय्यद, किरण बोर्‍हाडे, लखन जवेरी, आकाश आडांगळे, विनोद गोंदकर, नरेश सुराणा, सुलेमान सय्यद, साहिल शेख, सचिन सोनावणे, बद्रीनाथ वाकचौरे, सुनील गोरडे, भाजयुमोचे असंख्य कार्यकर्ते व मुस्लिम बांधव तसेच जेष्ठ मुस्लीम कार्यकर्ते उपस्थित होते. शहरात सर्व जाती धर्माचे नागरीक गुण्या गोविंदाने नांदतात, सर्वजण एकमेकांचे सन ऊत्सावात सहभागी होतात, रमजान महिना हा पवित्र महिना असून भाईचारा व बंधुभावाबरोबरच आणखी भाईचारा कसा वाढेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करून गरीब व गरजू नागरीकांना मदतीचा हात पुढे करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे यावेळी साईराज कोते यांनी सांगीतले.

LEAVE A REPLY

*