मिळेनासे झाले स्वच्छ पाणी !

0
संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालानुसार आशिया, लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकेत दरवर्षी सुमारे ३५ लाख नागरिकांचा मृत्यू दूषित पाण्याच्या संपर्कातून होणार्‍या आजारामुळे होतो.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, नागरिकांना स्वच्छ आणि चांगले पाणी तसेच उच्च आरोग्य सुविधा प्रदान केल्या तर संपूर्ण जगात आजारी पडण्याचे दडपण ९ टक्क्याने कमी होईल आणि भारतासह जगातील सर्वाधिक ३२ प्रभावित देशांतील ते प्रमाण १५ टक्क्यांपेक्षा अधिक कमी केले जाऊ शकते.

संपूर्ण जग दूषित पाण्याचा सामना करत आहे. सध्याची स्थिती इतकी ढासळली आहे की दूषित पाणी प्यायल्याने लोकांना भयानक आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे असंख्य नागरिक मृत्यूच्या दाढेत ओढले जात आहेत. संपूर्ण जगात रस्ते अपघाताने, एचआयव्ही किंवा अन्य आजाराने जेवढ्या नागरिकांचा मृत्यू होत नाही त्यापेक्षा अनेक पटीने अधिक मृत्यू दूषित पाणी प्यायल्याने होत आहे.

संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालानुसार संपूर्ण जगात दरवर्षी आठ लाख नागरिकांचा मृत्यू केवळ दूषित पाण्याच्या कारणामुळे होतो. संयुक्त राष्ट्र संघाने गेल्या काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले की, आशिया, लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकेत दरवर्षी सुमारे ३५ लाख नागरिकांचा मृत्यू हा दूषित पाण्याच्या संपर्कातून होणार्‍या आजारामुळे आला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जर नागरिकांना स्वच्छ आणि चांगले पाणी तसेच उच्च सुविधा प्रदान केल्या तर संपूर्ण जगात आजारी पडण्याचे दडपण ९ टक्क्याने कमी होईल आणि भारतासह जगातील सर्वाधिक ३२ प्रभावित देशांतील प्रमाण १५ टक्क्यांपेक्षा अधिक कमी केले जाऊ शकते.

संयुक्त राष्ट्र संघाच्या आकलनानुसार जगातील एक अब्जाहून अधिक नागरिकांना पाणी उपलब्ध नाही. ही वस्तुस्थिती आहे. जागतिक संघटनेने केलेला अभ्यास हा पुरावा आहे.

जर नागरिकांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून दिले तर दरवर्षी दूषित पाण्यामुळे होणार्‍या अतिसार, मलेरिया, काविळ यांसारख्या आजारांमुळे १ अब्ज ६० लाख नागरिकांवर असलेली मृत्यूची टांगती तलवार काढता येईल.

भ्रष्टाचार, लालङ्गितीचा कारभार, नोकरशाहीची उदासीनता, सक्षम संस्थांची अनुपलब्धता, पायाभूत सुविधांचा अभाव तसेच नागरिकांशी संबंधित असलेल्या प्रश्‍नांवर सरकारचे अंकुश नसणे या कारणांना यासाठी संयुक्त राष्ट्रासारख्या संघटना जबाबदार मानतात.

जगातील एकूण लोकसंख्येच्या पाचव्या हिश्यातील लोकांना पुरेसे पिण्याचे पाणी मिळत नाही. दूषित पाणी असणार्‍या जगातील १२३ देशांतील यादीत भारताचा क्रमांक १२१ व्या स्थानावर आहे. त्याचवेळी बांगलादेश स्वच्छ पाण्यासंदर्भात ८० व्या स्थानावर तर श्रीलंका आणि पाकिस्तान आपल्यापेक्षा वरच्या ४० व्या स्थानावर आहेत.

जगातील पाणी संकटाचा सामना करणार्‍या भारत आणि चीनमधील एकूण ४० टक्के जनता दूषित पाण्याची बळी ठरली आहे. पाण्याच्या उपलब्धतेत भारताचे स्थान हे १८० देशांच्या यादीत १३३ व्या स्थानावर आहे. जगातील अडीच अब्ज नागरिक स्वच्छ आणि चांगले पाणी, सांडपाण्याची व्यवस्था आणि पायाभूत सुविधांपासून वंचित आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगात एकूण मृत्युमुखी पडणार्‍यांमध्ये ६ टक्के मृत्यू हे दूषित पाण्यामुळे आणि सांडपाण्याचा योग्य निचरा न झाल्याने होतो. आपल्या देशात ग्रामीण भागात राहणार्‍या सुमारे ६.३ कोटी नागरिकांना स्वच्छ पाणीदेखील नशिबात नाही. ही आकडेवारी ब्रिटनच्या एकूण लोकसंख्येएवढी आहे.

वाईल्ड वॉटर रिपोर्टचा आधार घेतला तर वाढती लोकसंख्या आणि पाण्याची वाढती गरज आणि पाणी पातळी कमी यामुळे दूषित पाणी वाढत चालले आहे. याशिवाय सरकारी पातळीवरचे अपुरे प्रयत्नदेखील यामागचे कारण सांगितले जात आहे.

यामुळे मलेरिया, डेंग्यू, टायङ्गाईड, कॉलरा, काविळ यांसारख्या आजारांबरोबरच कुपोषणही वाढत चालले आहे. एवढेच नाही तर ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना वाढत्या तापमानामुळे जनावरांना चार्‍याची उपलब्धता करून देताना अडचणी येत आहेत.

त्याचबरोबर पाणी आणण्याची जबाबदारी घेणार्‍या महिलांना पाण्यासाठी अधिक भटकंती करावी लागत आहे.
देशात दरवर्षी १.०३ कोटी नागरिकांपैकी ७.८ लाख नागरिक दूषित पाणी प्यायल्याने आणि घाणीमुळे निर्माण होणार्‍या आजाराने मृत्युमुखी पडतात. अतिसारामुळे मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या ४.०२ लाख, कुपोषणामुळे २.१७ लाख तर मलेरिया, डेंग्यू आणि जपानी इंसेङ्गलाईटीसमुळे मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या सुमारे १९ हजार आहे.

विकसित देशात दूषित पाण्यामुळे मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या एक टक्क्याने कमी आहे. संयुक्त राष्ट्राच्या आकलनासुार जर स्वच्छ आणि चांगले पाणी उपलब्ध करून दिले तर जगातील सुमारे ७ अब्ज ३४ कोटी डॉलर्सची बचत होऊ शकते. त्याचबरोबर १० अब्ज डॉलर्सचे दरवर्षी उत्पादन मूल्य वाढेल आणि या मृत्यूमुळे होणार्‍या नुकसान भरपाईपोटी द्यावे लागणारे ३.६ अब्ज डॉलर्स हे अतिरिक्त उत्पन्न म्हणून पाहता येईल.

वाढत्या शहरीकरणामुळे आणि नागरिकरणामुळे निर्माण होणार्‍या समस्येपैकीच दूषित पाणी ही एक समस्या मानली जाते. स्वच्छ पाणी आणि हवा आता आपल्याला पुस्तकातच वाचावयास मिळेल, अशी परिस्थिती आहे. प्रदूषण, निरोगी जीवनाचा अभाव, आहार-विहाराच्या बदलेल्या सवयी आणि दूषित पाण्याचा सर्रास वापर यामुळे मानवाचे आरोग्य कमालीचे ढासळले आहे.

उघड्यावर मिळणारे खाद्यपदार्थ, सदोष पाणीपुरवठा यंत्रणा, सांडपाण्याची योग्य विल्हेवाट नाही आदी कारणांमुळे दूषित पाण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात दूषित पाणीपुरवठा अधिक होतो.

उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याने तळ गाठलेला असतो आणि तेच पाणी प्रक्रिया न करता पोटात जाते आणि आजारांना निमंत्रण मिळते. दूषित पाण्यासाठी स्वयंसेवी संस्था आणि सरकारचे प्रयत्न सुुरू आहेतच. पण वैयक्तिक पातळीवर आपण स्वच्छता किती राखतो, यावर आपले आरोग्य अवलंबून आहे.

मिलिंद सोलापूरकर

LEAVE A REPLY

*