आकाश सुझुकी शोरुमचा शुभारंभ

0
धुळे । दि.3 । प्रतिनिधी-येथील आकाश ग्रूपच्या आकाश सुझुकी या दुचाकी वाहनांच्या शोरुमचा शहरातील मालेगाव रोड, गुरुद्वाराजवळ दिमाखदार शुभारंभ करण्यात आला.
यावेळी व्यासपिठावर सुझुकी मोटार सायकल प्रा.लि.कंपनीचे पुर्व विभागाचे क्षेत्रीय व्यवस्थापक राजेश नायर, परिवहन विभागाचे सहाय्यक अधिकारी अविनाश राऊत, आय.डी.बी.आय.बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक अखिलेशकुमार मिश्रा, आयडीबीआय बँकेचे शाखा व्यवस्थापक विजय डागमवार, माजी आ.प्रा.शरद पाटील, हरिश्चंद्र दशपुते, रविंद्र दशपुते, प्रविण दशपुते आदी उपस्थित होते.

श्री.नायर, श्री.मिश्रा व प्रा.पाटील यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले की, आकाश सुझुकीच्या माध्यमातून ग्राहकांना अतिशय चांगली सेवा प्रदान केली जाईल.

ग्राहकांच्या अपेक्षा पुर्ण करण्यासाठी आम्ही कटीबध्द राहू. बदलत्या काळानुसार ग्राहकांच्या आवडीनिवडींचा विचार केला जाईल.

अजय लोखंडे, आशिष लोखंडे व अविनाश लोखंडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. गिरीश चौक यांनी सूत्रसंचालन केले. तर अविनाश लोखंडे यांनी आभार व्यक्त केले.

सुझुकी कंपनीच्या अ‍ॅक्सेस स्कूटरर्स व जिक्सर या बाईकला ग्राहकांची पसंती लाभली आहे.

 

LEAVE A REPLY

*