एस.व्ही.के.एम.शिरपूर कॅम्पसच्या नोकरीसाठी सीटीएफ विभागातील पाच विद्यार्थ्यांची निवड

0
शिरपूर । प्रतिनिधी-एसव्हीकेएम संस्थेच्या मुकेश पटेल स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अँन्ड इंजिनिअरिंग, शिरपूर कॅम्पसच्या सेंटर फॉर टेक्स्टाईल फंक्शन्स विभागातील पाच विद्यार्थ्यांची गिमाटेक्स इंडस्ट्रीजमध्ये नोकरीसाठी स्तुत्य निवड झाली आहे.
गेल्या 2017 या शैक्षणिक वर्षात पीजीडीटीपी उत्तीर्ण झालेल्या पाच विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंटद्वारे गिमाटेक्स इंडस्ट्रीज प्रा.लि. अहमदाबाद व सोरबे बायोटेक्नोलॉजी (इंडिया) प्रा. लि. मुंबईमध्ये स्तुत्य निवड करण्यात आली.

गिमाटेक्समधे रोहितगिरासे,रोहितजमादार, संभाजीपाटील, राहुल गिरासे व विजय पाटील यांची ट्रेनी इन प्रोसेसिंग डिविजन या पदावर प्रतिवर्ष 1.80 लक्ष वेतनावर निवड झाली आहे.

तसेच सोरबे बायोटेक्नॉलॉजीमध्ये सविता पाटील हिची निवड प्रतिवर्ष 2.20 लक्ष या वेतनावर करण्यात आली आहे.
विद्यार्थांचे एस.व्ही.के.एम. संस्थेचे अध्यक्ष अमरिशभाई पटेल, संस्थेचे सह-अध्यक्ष भुपेशभाई पटेल, विश्वस्त व कार्यकारी समिती सदस्य राजगोपाल भंडारी, शिरपूर कॅम्पसचे डायरेक्टर डॉ.रामगौड़, सी. टी.एफ़.चे सहयोगी अधिष्ठाता डॉ.पी.पी. रायचूरकर यांनी कौतुक केले आहे. विद्यार्थांना डायरेक्टर डॉ.रामगौड़, सी. टी.एफ़.चे सहयोगी अधिष्ठाता डॉ.पी.पी.रायचूरकर तसेच सी. टी. एफ़.च्या सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.

 

LEAVE A REPLY

*