Friday, April 26, 2024
Homeधुळेशिरपूर : साडेदहा लाखांची अफूची बोंड जप्त

शिरपूर : साडेदहा लाखांची अफूची बोंड जप्त

शिरपूर – मुंबई-आग्रा महामार्ग क्र.3 वरील शिरपूर तालुका पोलीस स्टेशनसमोर मध्यप्रदेशकडून येणार्‍या ट्रकमधून अफू वनस्पतीची सुकविलेली 104.700 किलो सुमारे दहा लाख 47 हजार रुपये किंमतीची बोंडे पोलिसांच्या पथकाने पकडली. ट्रकसह अफूची बोंडे असा 30 लाख 47 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी ट्रक चालकाला अटक केली आहे.

पोलीस प्रशासनाला गुप्त माहिती मिळाली की, ट्रक (क्र.एम.पी.44 एच.ए.0547) मध्ये अफीम वनस्पतीची सुकविलेले बोंडे नावाचा अंमलीपदार्थ भरुन राजस्थान येथून मुंबई-आग्रा महामार्गाने सांगवीवरुन कर्नाटक राज्याकडे जात आहे. या माहितीच्या आधारे दि. 1 जुलै रोजी पोसई वारे, पोसई खैरनार, पोहेकॉ संजय देवरे , पोहेकॉ राजेंद्र सोनवणे, पोना संतोष देवरे, पोकॉ शामसिंग पावरा, पोकॉ योगेश दाभाडे यांच्या पथकाने महामार्ग क्र.3 वर सापळा लावला असता ट्रक (क्र. एम.पी. 44 एच.ए.0547) सांगवीकडून येतांना दिसला.

- Advertisement -

त्यामुळे पथकाने चालकास वाहन थांबविण्याचा इशारा दिला. वाहनात चालकाशिवाय कोणीही नव्हते. त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव रघु कन्हैयालाल दायमा (वय-22 रा.दम्माखेडी ता.सितामहु जि.मंदसोर,मध्यप्रदेश) असे सांगितले. सदर गाडी रिकामी असून मंदसोर, मध्यप्रदेश येथून येथे आचार साठी कच्चे आंब्यांचा माल घेण्यासाठी जात आहे असे चालकाने सांगितले. परंतु पोलीसांना संशय आला. त्यानंतर ट्रकची तपासणी केली. वाहनाच्या कॅबीनमध्ये काहीही आक्षेपहार्य आढळून आले नाही. ट्रकच्या टपाची तपासणी केली असता टपावर एक लोखंडी झाकन दिसून आले. झाकन उचकावून पाहिले असता कॅबीन व ट्रॉलीमध्ये एक छुपा कप्पा दिसून आला. पत्रा काढून पाहणी केली असता तेथे काळ्या व पांढर्‍या रंगांच्या गोण्यांमध्ये अफूचे सुकलेले बोंडे मिळून आले.

ट्रकमधून 10 लाख 47 हजार रुपये किंमतीचे 104.700 किलो ग्रॅम वजनाचे अफूची सुकलेले बोंडे जप्त केली. तसेच दोन लाखांची ट्रक असा 30 लाख 47 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.याबाबत पोना संजीव नटवर जाधव यांनी फिर्याद त्यावरून एनडीपीएस अ‍ॅक्ट 1985 चे कलम 18 (ख) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. रघु कन्हैय्यालाल दायमा रा. मध्यप्रदेश याला अटक केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या