सरकारसाहेबांच्या वाढदिवसाला मिळाली हजारो पुस्तकांची भेट

0
दोंडाईचा । प्रतिनिधी-दोंडाईचा येथील उयोगपती तथा शिखर बँकेचे माजी विभागीय अध्यक्ष विकासरत्न सरकारसाहेब रावल यांच्या 70 व्या वाढदिवसानिमीत्त त्यांनी केलेल्या आवाहनानुसार त्यांच्या हजारो हितचिंतकांनी आज फुलहार किंवा बुकेऐवजी ‘बुक’ देवून त्यांचा सन्मान केला.
यावेळी एवढी पुस्तके जमा झाली की, दोन वेळा ग्रंथतुला केल्यावरही पुस्तके उरली. चाहत्यांनी भरभरून शुभेच्छांचा वर्षाव सरकारसाहेब रावल यांच्यावर केला. यामुळे सरकारसाहेब अतिशय भारावले होते.

यावेळी बाजार समितीचे सभापती तथा पणन महासंघाचे संचालक नारायण पाटील, रोटरीचे अध्यक्ष अनिश शाह, सचिव राकेश जयस्वाल, डॉ.फुलंब्रीकर, रामेश्वर इंदाणी, डॉ.चेतन बच्छाव, डॉ.ओमप्रकाश अग्रवाल, बी.एल.जैन, श्रीकांत इंदाणी, डॉ.चेतन बच्छाव, डॉ.हेमंत नागरे, हेमंत सोनवणे, डॉ.अविनाश मोरे, डॉ.संतोष आव्हाड आदी उपस्थित होते.

दरम्यान, वाढदिवसानिमीत्ताने सरकारसाहेब रावल यांनी सकाळी देवदर्शन करून कार्यकर्त्याकडून पुस्तक रूपी शुभेच्छा स्विकारल्या, त्यानंतर राज्याचे रोहयो व पर्यटन मंत्री ना. जयकुमार रावल यांच्याहस्ते रावल गढीवर जनदरबार कार्यालयाच्या प्रागंणात रक्तदान शिबीराचे उदघाटन करण्यात आले.

रोटरी सिनीयर्सकडून रक्तदार शिबीर घेण्यात आले.आदर्श कामगार संघटना कार्यालय, रावल गढी, दादासाहेब रावल नॉलेज सिटी, अहिंसा पॉलिटेकनिक याठिकाणी रक्तदान शिबीरचे आयोजन करण्यात आले होते. एकुण 212 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

यासाठी डॉ.मुकुंद सोहोनी, नामदेव थोरात, चेतन सिसोदिया, राजेश माखिजा, दत्ता देशपांडे, यांनी विशेष परीश्रम घेतले. याशिवाय रेल्वे स्टेशनजवळ अन्नदान करण्यात आले. याशिवाय दोंडाईचा नगरपरीषदेच्या आरोग्य विभाग आणि उपजिल्हा रूग्णालय यांच्या संयुक्त विदयमाने दोंडाईचा शहरातील नविन सर्व घरकुल वसाहतीमध्ये मोफत सर्व रोगनिदान शिबीर घेण्यात आले.

यात शेकडो रूग्णांची तपासणी करण्यात आली. पालिकेच्या आरोग्य विभाग आणि पतंजली केंद्र दोंडाईचा यांच्या संयुक्त विदयमाने सकाळी आजपासून कायमस्वरूपी योगासने वर्ग सुरू करण्यात आले.

रावल नगरमध्ये बांधकाम सभापती संजय मराठे, भरतरी ठाकूर, प्रविण महाजन, विरेंद्र गिरासे, पंकज बोरसे, कांतीलाल मोहिते यांच्यासह कार्यकर्त्यांकडून वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सरकारसाहेब रावल यांना वाढदिवसानिमीत्त बुके ऐवजी बुक देवून सत्कार केला. यात जिल्हा परीषद सदस्स, पंचायत समिती सदस्य, दोंडाईचा नगरपालिकेचे सर्व सभापती आणि नगरसेवक, खरेदी विक्री संघाचे संचालक, बाजार समितीचे संचालक, दुध संघाचे संचालक, ग्राहक भांडाराचे संचालक, स्वोध्दारक विदयार्थी संस्थेतील संचालक, सर्व शाखाप्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, विविध गावातील सरपंच ग्रा.पं.सदस्य, भाजपाचे शिंदखेडा तालुक्यातील पदाधिकारी, फेस्कॉमचे प्राचार्य व्ही.के.भदाणे, बी.एन.पाटील, सुरेश पोतदार यांनी नाशिक विभाग जेष्ठ नागरीक संघाकडून मानपत्र देवून त्यांचा विशेष सत्कार केला.

 

 

 

LEAVE A REPLY

*