दंगलींचा इतिहास विसरा, गुण्यागोविंदाने रहा !

0
धुळे । दि.24 । प्रतिनिधी-शहरात मागील काळात दंगली उसळल्या त्या एक वाईट स्वप्न म्हणून विसरुन जा भविष्यात सर्व जातीधर्माने गुण्यागोविंदाने रहावे असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधिक्षक एम. रामकुमार यांनी केले.
पोलिस दलातर्फे चिंतन हॉल येथे आज शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी एम. रामकुमार हे बोलत होते.

बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, अपर पोलिस अधिक्षक विवेक पानसरे, डीवायएसपी हिम्मत जाधव, निलेश सोनवणे, उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ, डीवायएसपी एन.एल.तडवी, पोलिस निरीक्षक रमेशसिंह परदेशी, अनिल वडनेरे, दत्ता पवार, किशोर शिरसाठ, दिवानसिंग वसावे, रत्नपारखी, श्री.मुंडे, सहाय्यक उपनिरीक्षक हेमंत पाटील, अभिषक पाटील, जयंत शिरसाठ, तोरडमल, ज्ञानेश्वर वारे, अर्जुन पटले, बाबा धिरजसिंग, रॉड्रीक्स विल्सन, गजनन पाठक, शकील मोमीन, सोमनाथ गुरव आदींसह सर्व धर्माचे गुरु, सामाजिक कार्यकर्ते, पोलिस मित्र आदी उपस्थित होते.

पुढे बोलतांना एम. रामकुमार म्हणाले की, चांगला विचार घेवून आपण एकत्र आलो आहोत, तुम्ही-आम्ही एक असतांना मनात परस्परांविषयी द्वेष येतो कुठून? द्वेष आला नाही तर दंगली उसळणार नाहीत असेही त्यांनी सांगितले.

डीवायएसपी हिंमतराव जाधव म्हणाले की, धुळे शहर हे संवेदनशील शहर म्हणून ओळखले जात असले तरी मानवी मनातील संवेदनशील गुणाचा प्रत्यय देणारा आहे. शहरातील नागरीक प्रेमळ, शांतता प्रिय आहेत असे त्यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

*