आरोपींची दबंगगिरी : वाहन उलटून पाच पोलीस जखमी

0
धुळे । दि.4 । प्रतिनिधी-संशयित आरोपीने पोलिसांच्या चारचाकी वाहनाचे स्टेअरिंग फिरविल्याने झालेल्या अपघातात पाच पोलिस कर्मचारी जखमी झाले.
ही घटना चाळीसगाव चौफुलीच्या हॉटेल कुणालजवळ सोमवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी संशयित आरोपीस अटक करून चाळीसगाव पोलिस स्टेशनला त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
सदिक शेख नुर महंमद शेख (34)रा.मरकस मशिदीजवळ मौलवीगंज धुळे याने त्याची अटक टाळण्यासाठी दबंगगिरी केली.

यासाठी त्याने पोलिसांच्या वाहनाचा (क्र.एम.एच.18/ए.एम.0187) ताबा घेतला. स्टेअरींग फिरवून वाहन उलटविण्याचा प्रयत्न करून पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यात वाहनाचे मोठे नुकसान झाले.

यात पोहेकॉ.एन.व्ही.शेख रा.चाळीसगावरोड, पोहकॉ.एस.ए.पाटील.एच.आर.पवार, नारायण बालय्या कटकुरी औरगाबाद, लहू बाळकडू थोटे, औरगाबाद हे पाच कर्मचारी जखमी झाले आहेत.

पोहेकॉ.संजय अभिमन पाटील याने दिलेल्या फिर्यादीवरून सदिक शेख नुर महंमद शेख यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरूध्द 353,307,427,186 सह सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सपकाळे करीत आहे.

LEAVE A REPLY

*