पिंपळनेर, निजामपूर परिसरात पाऊस

0
पिंपळनेर/निजामपूर । वार्ताहर-पिंपळनेर परिसरात दोन दिवसापासून दमदार पावसाच्या आगमनामुळे शेतकरी सुखावला असून आता पेरणीला सुरुवात होणार.
पिंपळनेर व परिसरात दि.25 रोजी सकाळी 7 ते दु.2 वाजेपर्यंत व दि.26 रोजी दु. 2 वाजेपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत दमदार सततधार पावसामुळे परिसरात प्रतिक्षेत असलेले शेतकरी पेरणी कामाला सुरुवात करतील.
पिंपळेनर परिसरात मुख्यतः मका, बाजरी, सोयाबीन, भात, नागली, भुईमूग पिकांचा पेरा होतो. शेतकरी खते, बी-बियाणे, खरेदीची लगभग सुरु असून तसेच छत्र्या, रेनकोट, मेनकापड खरेदीही सुरु आहे.

आता थम मशिनद्वारा खत विक्री- काही मशिन फेल अल्याने दुकानदारांसह शेतकर्‍यांना अडचणीचे झाले आहे आज चौधरी अ‍ॅण्ड सन्स या दुकानावर शेतकरी खत घेण्यासाठी गेले असता त्यांना मिळालेल्या थम मशिनमध्ये फर्टीलायझर अ‍ॅप्स सुरुच होत नाही.

त्यामुळे शासनापर्यंत, खतविक्री होतांना दिसत नाही. त्यामुळे कंपनीलाही थेट अनुदान मिळत नाही. पण पाऊस झाला. खत दिल्याशिवाय गत नाही.

या दुकानाचे मालक जि.प. सदस्य योगेश चौधरी यांनी खत विक्री केली. पण थमसने लींक होत नसल्याने पुढील, पेरणीसाठी लागणारे तसेच युरीया खतांच्या गाड्या माझेकडे येणार नाही.

ही खंत व्यक्त केली. आता प्रत्येक शेतकर्‍यांच्या आधारकार्ड व सातबारा व थम घेतल्याशिवाय खतांची विक्री होऊ शकणार नाही. शेतकर्‍यांना आधारकार्ड सक्तीचे करण्यात आले आहे.

आदिवासी पश्चिम पट्यात पावसाने दमदार हजेरी दिल्याने, भात व नागली रोप वाफे (आवनी) तयार असून, हात रोपणीसाठी शेतीची मशागत सुरु केली असून रोप तयार झाल्यावर संतत धार पावसात आदिवासी बांधव हात रोपणीला सुरुवात करतील.

आदिवासी पश्चिम पट्ट्यात सुवासिक तसेच शेंद्रीय भात शेती केली जाते. त्यामुळे पिंपळनेर आदिवासी पट्यातील भात व नागली उत्पन्नात वाढ होत असून मार्केटमधेही भाव मिळतो. धुळे जिल्ह्यासह, जळगाव, मालेगाव भागातून तांदुळ, नागली खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते.

निजामपूर परिसरातही पाऊस- निजामपूर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाची हजेरी लागत आहे. यामुळे परिसरातील नदी-नाल्याने पूर आले असून शेतांमध्येही पाणी साचले आहे.

यामुळे शेतकर्‍यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. काल दि. 25 रोजी पावसाने तासभर हजेरी लावली. तसेच आजही दुपारी 4 वाजेनंतर परिसरात तासभर जोरदार पाऊस झाला.

यामुळे रोहीणी नदीला पूर आला असून शेतांमध्ये अनके ठिकाणी गुडघाभर पाणी साचले आहे. कारखाना ते सामोडेपर्यंतच्या भागात पावसाचा चांगला जोर होता. पहिल्यांचा चांगला पाऊस झाल्याने शेतकरी आनंदी झाला आहे.

 

LEAVE A REPLY

*