पिंपळनेर परिसरातील सर्व प्रकल्प ‘ओव्हरप्लो’

0
पिंपळनेर । दि.1 । वार्ताहर-पिंपळनेर पश्चिम पट्ट्यात संततधार पावसामुळे परिसरातील सर्व प्रकल्प तुडूंब भरुन ओसांडून वाहू लागले, पश्चिम पट्ट्यातील आदिवासी बांधवांची भात व नागली रोपणीला सुरुवात.
पिंपळनेर पश्चिम पट्ट्यात पांझरा, जामखेली, कान, गटखळ नदीच्या उगमस्थानावर गेल्या 10 ते 12 दिवसापासून संततधार पाऊस सुरु असल्याने लहान मोठे पाझर तलावासह सर्व प्रकल्प तुडूंब भरुन ओसंडून वाहून लागले.
यात धुळे जिल्ह्याची जीवनदायीनी पांझरा नदीच्या शेंदवड, मांजरी भागात जोरदार पाऊस झाल्याने पांझरा नदी भरुन वाहत असल्याने लाटीपाडा धरण पुर्ण क्षमतेने भरुन ओव्हरफ्लो झाले आहे.

तसेच जामखेली धरण पुर्ण क्षमतेने भरुन ओसंडून वाहत आहे. तर कान नदीवरील काबर्‍याखडक व मालनगाव धरणही पुर्ण भरुन वाहत आहे आणि गटखळ नदीच्या उमगस्थान विरखेल, धामणधर भागातही संततधार सुरु असल्याने विरखेल धरण पुर्ण भरुन गटखळ नदीही खळाळून वहात आहे. पांझरा, कान, जामखेली व गटखळ नदीचे पाणी एकत्रीत अक्कलपाडा धरणात पाणी पोहचू लागल्याने आक्कलपाडा धरणही काही दिवसात पुर्ण क्षमतेने भरेल. असे चित्र दिसत आहे.

आक्कलपाडा पुर्ण भरल्यानंतर बोगदा कालवा तसेच एक्सप्रेस कॅनलद्वारे धुळे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या जलाशयात पाणीसाठा करण्यात येवू शकतो. पांझरा नदी पिंपळनेर ते धुळे, न्याहळोद, बेटावद पर्यंतच्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटू शकतो.

पिंपळनेर आदिवासी पश्चिम पट्ट्यात संततधार पावसामुळे, शेती तुडवून (आवणी करुन) नागली व भात रोपांची लावणी सुरु झाली आहे.

हात रोपणीचा सुवासीक भात व नागरी पिकाला मोठी मागणी असल्याने आदिवासी बांधव नागली व भात मुख्य पिकासह सोयाबीन, भुईमूग, सावा, भगर, मका पिकांचाही पेरा करतात.

यंदा उत्तम पावसाळा असल्याने पिकेही उत्तम आहेत.त्याच प्रमाणे या पावसामुळे जंगलात व वनविभागाच्या पठार क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात आली आहे ते पिकेही उत्तमस्थितीत दिसत आहे.

त्यामुळे शेतकरी वर्गात समाधान व आनंद दिसत आहे. केवळ शेलबारी एम.आय.टॅन्क केवळ 5 टक्के भरला आहे. येणार्‍या पावसात भरेल अशी आपेक्षा आहे.

 

LEAVE A REPLY

*