न्याहळोदला ईदनिमित्त मंदिर ते मशिदी सलोखा मानवी साखळी

0
कापडणे । दि.29 । प्रतिनिधी-तालुक्यातील न्याहळोद येथे हिंदु-मुस्लिम बांधवांनी ईदनिमित्त एकात्मतेचे दर्शन घडविले. येथील प्राचीन मशिदीपासुन पुरातन मंदिरापर्यंत मानवी साखळी करण्यात आली.
हिंदु-मुस्लीम युवकांनी हातात-हात घालत तयार केलेल्या या सलोख्याच्या मानवी साखळीने सर्वांचे लक्ष वेधुन घेतले. येथे ईदनिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध मान्यवर उपस्थित होते. ईद उत्साहात साजरी करण्यात आली.

ग्रामिण भागात हिंदु मुस्लिम ऐक्याचा संदेश देण्यासाठी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महादेव मंदिराच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणुन धुळे गुरुद्वारचे धर्मप्रमुख बाबा धिरजसिंह होते.

तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन सेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, माजी आमदार प्रा. शरद पाटील, पं.स.चे माजी सभापती कैलास पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किर्तीमंतराव कवठळकर, नितीन पाटील, पं.स.सदस्य मुकेश पवार, तंटामुक्त समिती अध्यक्ष मोहन कोळी, सरपंच सुभाष जाधव, कापडणे सरपंच भटु पाटील, प्रमोद पाटील, अ‍ॅड.मिलींद बोरसे, देवीदास हाटकर, नितीन माने, विशाल साळवे, भुरा पठाण, कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक व सामाजिक कार्यकर्ते अशपाक खाटीक आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी हिंदु बांधवांनी मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

यानंतर मंदिर ते मशिद अशी मानवी साखळी करत एकतेच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

परमेश्वर, अल्लाह, ईश्वर परमात्म्याचे वेगवेगळी नावे असले तरी त्याने निर्माण केलेल्या सुर्य,चंद्र,पाणी,रक्त,हे सर्व मानवाचे एकच आहे.

उपासनेच्या पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी सर्वच धर्मातील साधु संतांसाठी प्रेमाचा संदेश दिला आहे त्यामुळे समाजातील सर्वानी मीळुन एकमेकांची सन साजरा करणे म्हणजे प्रेमाचा संदेश होय असे प्रतिपादन यावेळी बाबा धिरजसिंह यांनी केले तर हिलाल माळी यांनी सांगीतले कि, रमजान महीना हा अत्यंत पवित्र महिना असतो.

या महिन्यात मुस्लिम बांधव अल्लाहाच्या आदेशाचे पालन करीत गरीब, श्रींमंतीची दरी कमी करण्याचे प्रयत्न करतात.
न्याहळोद येथील मंदिराच्या साक्षीने झालेला हा ईद मिलनाचा कार्यक्रम सर्वासांठी प्रेरणादायी आहे असे त्यांनी सांगीतले.

प्रा.शरद पाटील यांनी हिंदु-मुस्लीम तरुणांनी पुढे येत सामाजिक कार्याची व एकतेची गुढी आपल्या खांद्यावर घेतली पाहिजे असे आवाहन केले.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते अशपाक खाटिक यांनी केले तर आभार प्रदर्शन अशपाक गुलशेर खाटिक यांनी केले कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी प्रकाश वाघ,नासीर पठान,संजय बागले, वसीम खाठीक,अमजत पठाण,जतीन खाटिक,मोहन धोबी,दिनेश टेलर ,अशोक वाघ आदी प्रयत्नशिल होते.

 

 

LEAVE A REPLY

*