गुड्या खुनाच्या चौकशीची ‘रेल्वे’ तुमच्या घराजवळ थांबणार !

0
धुळे । दि.3 । प्रतिनिधी-गुड्ड्या घटनेत तुमचे पाय किती खोलवर फसले आहेत, याची तुम्हाला जाणीव आहे. म्हणूनच गुड्या जिल्हा बँकेत येत होता, बंगल्यावर भेटायला येत होता, अशी आवई उठवित आहात.
आता गुंड गुड्ड्या खुनाचा तपास मुंबई क्राईम ब्रँचकडे देण्यात आला आहे.त्यामुळे तुम्ही कितीही कोल्हेकुई करा. गुड्डया खुनाचा तपास करणारी क्राईम ब्रँचची रेल्वे तुमच्याच घराजवळ येवून थांबणार आहे.
आता किती दिवसात तुम्ही आमच्या नेत्यांना तुरुंगात पाठवणार आहात, ते जाहीर करावे, असे आव्हान राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष मनोज मोरे यांनी आ. अनिल गोटे यांना दिले आहे.

त्याचप्रमाणे निवडणुकीसाठी आता गुड्याच्या खुनाचा वापर करणार आहात का? असा खोचक सवालही मोरे यांनी उपस्थित केला आहे.

पत्रकात मोरे यांनी म्हटले आहे की, जिल्हा पोलीस प्रशासनाने या गुन्ह्यातील 9 ते 10 आरोपींना अटक केली असून योग्य दिशेने तपास जात आहे.

असे असताना जिल्हा पोलीस प्रशासनावर अविश्वास दाखवत मुंबई क्राईम ब्रँचकडे या गुन्ह्याचा तपास देऊन तुम्ही संशयाच्या भोवर्‍यात स्वतःच अडकले आहात.

नेहमीची गोबेल्स नीती गुड्या प्रकरणात तुम्ही वापरायला गेलात आणि स्वतःच फसलात. या वेळेस तुम्हाला 18 वर्षात अपेक्षित नसलेले उत्तर कदमबांडे यांनी दिले. तुम्ही किती खोटारडे आहात, या विषयी जनताच आता बोलू लागली.

तुम्ही मला छपरी गुंड म्हणतात. मात्र तोडीपाणी करायचे धंदे तुमचे. अवैध व्यवसाय, रेती माफियांकडून हप्ते घेणे हे धंदे तुमचे.

आता एकतर या सर्व आरोपाचा सोक्षमोक्ष लावून मुख्यमंत्र्यांना कारवाई करावयास सांगा, असा टोमणाही मोरे यांनी लगावला आहे.

मोरे यांनी पुढे म्हटले आहे की, 18 वर्षापासून तुम्ही बेताल व तथ्यहीन आरोप करून माजी आ.राजवर्धन कदमबांडे यांची प्रतिमा खराब करण्यात यशस्वी झाला आहात.

मात्र संपूर्ण खान्देशात कोणत्याही आमदाराने केला नसेल असा शाश्वत विकास श्री. कदमबांडे यांनी केला आहे. कुमारनगर ते प्रमोदनगर जोडणारा पुल, आई एकविरा मातेचे मंदिर ते जुने धुळे जोडणारा पूल, इंग्रज काळातील मुदत संपलेला मोठ्या पुलाला समांतर पूल, शाहू महाराज नाट्य मंदिर, शहराच्या मध्यवर्ती भागात खेळाडूसाठी उभारलेले सुंदर मिनी स्टेडीयम, गोंदूर रोड वर उभारलेले जिल्हा क्रीडा संकुल, हरण्यामाळ तलाव, जम्बो कॅनॉल, 136 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना राष्ट्रवादीच्या काळात पूर्णत्वास आली.

सध्या शहरात सुरु असलेले 42 कोटी रुपये किमतीचे शहरातील रस्ते, त्यात 100 फुटी रस्त्यापासून ते गांधी पुतळा ते नदी काठाला लागून संतोषी माता मंदिरापर्यंतचा रस्ता, शहरातील कॉलनी भागातील रस्ते, गटारी असे असंख्य कामे श्री.कदमबांडे यांनी केली.

मात्र तेच ते आरोप केल्यामुळे जनतेपुढे कदमबांडे यांची नकारात्मक प्रतिमा उभी करण्यात तुम्ही यशस्वी झालात, असेही मोरे यांनी म्हटले आहे.

 

LEAVE A REPLY

*