शहरात पार्किंगचा प्रश्न कायम; मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष

0
धुळे / शहरातील विविध ठिकाणी पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. अनेक ठिकाणी बेशिस्तपणे वाहने उभी केली जातात.
त्याचा अडथळा येणार्‍या-जाणार्‍या वाहनांना होतो. मात्र महापालिका व पोलीस प्रशासनातर्फे याबाबत दखल घेतली जात नाही.
शहरात ठिक-ठिकाणी वाहनधारकांसाठी पार्किंगची व्यवस्था केल्यास वाहतुक सुरळीतपणे होण्यास मदत होणार आहे.
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाचकंदील परिसरात फेरीवाल्यांसह हातगाड्यांचा वावर असल्याने या ठिकाणी वाहतुकीस व पायी चालणार्‍या नागरिकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.

आग्रारोडवर उभ्या राहणार्‍या हातगाड्यांमुळे नागरिकांना चालण्यास अडचण होते. तसेच येथील दुकानांसमोर होणार्‍या पार्कींगमुळे ग्राहकांना कसरती करून दुकानात प्रवेश करावा लागतो.

पार्कींग व हातगाड्यांच्या आणि वाहनांच्या गर्दीमुळे बाजारपेठेचा श्वास कोंडला गेला आहे. याबाबत महापालिका व वाहतुक शाखेकडून दुर्लक्ष होत असल्याने व्यापार्‍यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

तत्कालीन आयुक्त डॉ.नामदेव भोसले यांनी पार्कींग व्यवस्थेला शिस्त लावली होती. पाचकंदील चौक आणि आग्रारोड मोकळा केला होता.

व्यापार्‍यांनी आजवर जकात, एलबीटी व अन्य कर मोठ्या प्रमाणात भरतात. पण सुविधा मिळत नाही. बाजारपेठेसाठी स्वतंत्र वाहनतळाची व्यवस्था करावी याचे भान मनपाला नाही.

त्यामुळे ज्या दुकानामध्ये ग्राहकाला दुकानात जाण्यासाठी रस्त्यात आडव्या लागलेल्या गाड्यांचा सामना करावा लागतो.

तसेच परिसरात टॅक्सी, रिक्षांच्या वाहतुकीमुळे एस.टी. बसेसना आगारात जाण्यासाठी अडथळा निर्माण होतो. तसेच शहरात ठिकठिकाणी पार्कींगची व्यवस्था नसल्याने वाहनधारकांकडून बेशिस्तपणे वाहने लावली जातात.

मात्र वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍यांकडून कोणत्याही प्रकारची दंडात्मक कारवाई होतांना दिसत नाही.

LEAVE A REPLY

*