तरुण अभियंत्याची गळफास घेवून आत्महत्त्या

0
धुळे / शहरातील नकाणे रोडवरील श्रध्दानगरात राहणार्‍या तरुण अभियंत्याने राहत्या घरी पंख्याच्या दोरीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.याबाबत पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात प्रथमदर्शी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.अभियंत्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
याबाबत माहिती अशी की, शहरातील नकाणे रोडवरील श्रध्दानगरात राहणारे स्वप्नील सुभाष अहिरे हे सार्वजनिक बांधकाम खात्यात खाजगी इंजिनिअर म्हणून काम करीत होते.

त्यांनी आज सकाळी राहत्या घरी पंख्याला दोरी बांधून गळफास घेतला. हा प्रकार त्यांचा भाऊ पराग अहिरे यांच्या लक्षात आला. त्यांनी गळफास घेतलेल्या परागला खाली उतरविले.

उपचारासाठी भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉ.सिध्दार्थ पाटील यांनी स्वप्नीलला तपासून मृत घोषित केले.

स्वप्नीलने मध्यरात्री आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. स्वप्नीलचे मोठे भाऊ पराग अहिरे हे येथील बांधकाम क्षेत्रात नावाजलेले इंजिनिअर आहेत.

तर त्यांचे वडील धुळे विज वितरण कंपनीतून सेवानिवृत्त झाले आहेत. स्वप्नीलच्या पश्चात आई-वडील, पत्नी, भाऊ, बहिण, एक मुलगी असा परिवार आहे.

 

LEAVE A REPLY

*