पांझरा किनारच्या रस्त्यांना मनपाची ना हरकत

0
धुळे / शहरातील पांझरा नदीकिनारी दोन्ही बाजूस कुमारनगर ते जुना मुंबई-आग्रा रस्त्याच्या मोठ्या पुलापर्यंत रस्ते बांधण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याचा निर्णय आज महापालिकेच्या महासभेत घेण्यात आला.
महापालिकेची महासभा महापौर सौ.कल्पना महाले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत धुळे पांझरा नदीकिनारी दोन्ही बाजूस कुमारनगर ते मुंबई- आग्रा रस्त्याच्या मोठ्या पुलापर्यंत रस्ते बांधणे कामासाठी परस्पर ना हरकत प्रमाणपत्र न देता महासभेत निर्णय घ्यावा, असा विषय चर्चेला आला.
या चर्चेत शिवसेनेचे नरेंद्र परदेशी आणि नुकतेच भाजपात दाखल झालेले फारुख शहा यांनी चर्चेत सहभाग घेतला.

पांझरा नदीपात्राच्या दोन्ही बाजूला रस्ता नाही, परंतु रस्ता करुन दाखवायचे आहेत. हे रस्ते नदीपात्रात जातील.

विकास कामाला विरोध नाही तर अनागोंदी चाललेल्या प्रकाराला हा विरोध आहे, असे नरेंद्र परदेशी यांनी सांगितले.

आतापर्यंत धुळे महापालिकेला इतके अनुदान दिलेले नाही. महापालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता असतानाही अनुदान मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. विकासाचे काम आहे.

त्यामुळे रस्त्यांसाठी ना हरकत प्रमाणपत्र द्यायला पाहिजे. अन्यथा आलेले अनुदान परत जाईल, असे फारुख शहा यांनी सांगितले.

महापालिकेच्या सभेत या विषयाला अगोदरच विरोध झाला आहे. त्यामुळे रस्त्यांना ना हरकत प्रमाणपत्र दिले जाणार नाही, असे महापौर सौ.कल्पना महाले यांनी सभागृहाला सांगितले.

LEAVE A REPLY

*