अल्पवयीन मुलीवर बलात्कार

0
धुळे / खवश्यापाडा (वाकपाडा) ता. शिरपूर येथे राहणार्‍या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला मारहाण करुन व चाकूचा धाक दाखवून तिच्याच घरात दुपारी 12 वाजता वीस वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे.
याप्रकरणी शिरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नराधमाला शिरपूर पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत माहिती अशी की, खवश्यापाडा (वाकपाडा) ता. शिरपूर येथे राहणार्‍या पंधरा वर्षीय मुलीला तिच्याच घरात दि. 16 मे रोजी दुपारी 12 वाजता नटराज झबू पावरा (वय20) रा. वाकपाडा याने मारहाण करुन व चाकूचा धाक दाखवून त्या मुलीवर बलात्कार केला.

याबाबत पीडित मुलीने शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 376, 323, 504 व बाललैंगिक अत्याचार संरक्षण कायदा सन 2012 चे कलम 4, 8, 12 प्रमाणे नटराज झबु पावरा याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. सदर नराधमाला शिरपूर पोलिसांनी काल रात्री 8.30 वाजता अटक केली.

LEAVE A REPLY

*