प्राणी संग्रहालय, सफारी गार्डनचे काम सुरु करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता

0
धुळे / धुळ्यात वन्य प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत येणार्‍या वाघ, सिंह किंवा तत्सम प्राणी सोडून सफारी गार्डनसाठी मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली असून सफारी गार्डनचे काम मान्यता दिली आहे, अशी माहिती आ. अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आ. गोटे यावेळी म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी धुळ्यासाठी तुम्हाला काय हवे? असे मनमोकळेपणाने विचारले. या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री धुळे शहरातील नागरीकांवर बेहद खुश दिसले.

वन्य प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत येणार्‍या वाघ, सिंह किंवा तत्सम प्राणी सोडून सफारी गार्डनला परवानगी दिली तर, सफारी गार्डनमध्ये अनेक गोष्टी करणे सोयीचे होऊ शकेल, ही बाब आपण मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली.

त्यावर लगेचच निवेदन तयार करून आपण मुख्यमंत्र्यांना सादर केले. मुख्यमंत्र्यांनी तातडीने दखल घेवून संबंधीत खात्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना सूचना दिल्या.

येत्या महिनाभरात सफारी गार्डनची परवानगी मिळविण्याचा प्रयत्न करा, असे आदेशही दिले. या पार्श्वभूमीवर परवानगीची कागदपत्रे हातात येताच सफारी गार्डनचे भूमीपूजन करून प्रत्यक्ष कामाला प्रारंभ करणार आहे, असेही आ. गोटे म्हणाले.

 

LEAVE A REPLY

*