शासकीय व निमशासकीय कर्मचार्‍यांनी शुभ्र शिधापत्रिका वापरावी

0
धुळे  / धुळे शहर व जिल्ह्यातील ज्या शासकीय व निमशासकीय सरकारी कर्मचार्‍यांनी अद्यापही पिवळे व केशरी कार्ड धारण केलेले आहे व त्याद्वारे शासकीय सवलतीचा लाभ घेत आहेत, अशा कर्मचार्‍यांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी शुभ्र शिधापत्रिका वापरावी असे जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय बोरुडे यांनी कळविले आहे.

सर्व शासकीय व निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी अद्याप पर्यंत पिवळे व केशरी रेशनकार्ड धारण केले असेल तर त्यांनी ते त्वरीत तहसीलदार यांचेकडे जमा करुन तत्काळ शुभ्र रेशनकार्ड तयार करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी, धुळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

LEAVE A REPLY

*