आयुक्तांच्या बंगल्यावर दगडफेक करणार्‍यांवर कारवाई करा

0
धुळे / मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांच्या मयुर कॉलनीत असलेल्या निवासस्थानावर अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक करुन दहशत निर्माण केल्याचा प्रकार अतिशय निंदनीय आहे.
संबंधीतांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी याबाबत सखोल चौकशी करुन या प्रकरणाचा छडा लावून गुन्हेगारांवर त्वरित कडक कारवाई करावी, अशी मागणी महापौर सौ.कल्पना महाले यांनी पोलिस आयुक्तांकडे केली आहे.

याबाबत निवेदनात म्हटले आहे की, एका महिला अधिकार्‍यावर झालेला हा हल्ला दडपशाही व झुंडशाहीचे प्रतिक आहे. श्रीमती धायगुडे या मनपाच्या आयुक्तपदी कोणत्याही दबावाला बळी न पडता आपले कामकाज करीत आहे.

अशा प्रकारे झालेला भ्याड हल्ला हा त्यांचे मनोधैर्य कमी करण्याचा प्रकार आहे. या आधीच निडर व नि:स्वार्थी काम करणारे अधिकारी शहराच्या एकूणच नावलौकिकामुळे काम करण्यास नाईच्छूक असतात.

त्यात अशा प्रकारे निंदनीय हल्ला झाल्याने अशा अधिकार्‍यांची मानसिकता व धैर्य कमी होते. आयुक्त धायगुडे यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक चांगले व कायदेशीर कामे करुन मनपाचा शासनस्तरावर वरच्या क्रमांकावर नेण्याचा प्रयत्न केलेला आहे.

भ्रष्ट व बेकायदेशीर कामांना थारा न देता आयुक्तांनी सुरु केलेल्या कामास बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न काही घटकांकडून केला जात आहे. हा प्रयत्न अत्यंत निषेधार्ह आहे.

 

LEAVE A REPLY

*