धुळ्यातील दोघांचा गिरणा डॅममध्ये बुडून मृत्यू

0
धुळे / परीक्षेसाठी बहिणीसोबत मालेगाव येथे गेलेल्या भावासह दोघांचा गिरणा डॅममध्ये बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज (दि.22) दुपारी घडली. या घटनेमुळे शहरातील मिल्लत नगरात शोककळा पसरली आहे.
शहरातील मिल्लत नगरात राहणारा सलमान खान वाहिद खान हा त्याच्या बहिणीचा तृतीय वर्षाचा शेवटचा पेपर मालेगाव येथे असल्याने चारचाकी वाहनाने मालेगाव येथे गेला होता.
बहिणीचा पेपर संपल्यानंतर सलमान खान हा त्याच्या बहिणीसह गिरणा डॅम येथे फिरण्यासाठी गेला. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे त्याला डॅममध्ये पोहण्याचा मोह झाला.
सलमान खान आणि त्यांचा गाडीचा चालक शेख युसूफ, रा. हाजी मुल्लानगर, धुळे हे दोघे जण पोहण्यासाठी डॅममध्ये उतरले. शेख युसूफला पाण्याचा अंदाज आला नाही.
तो खोल पाण्यात गेल्यामुळे गंटागळ्या खावू लागला. त्याला वाचविण्यासाठी सलमान गेला, परंतु तो शेख युसूफला वाचवू शकला नाही.

स्वत:ही पाण्यात गंटागळ्या खावू लागला. भाऊ पाण्यात बुडत आहे हे सलमानच्या बहिणीने पाहिले आणि तिने आरडाओरड केली.

त्यामुळे डॅमच्या आजुबाजूला उपस्थित असलेले धावून आले. काहींनी पाण्यात उडी घेतली, परंतु तेवढ्यात सलमान व शेख युसून पाण्यात बुडाले होते.

पट्टीच्या पोहणार्‍यांनी दोघांना पाण्याबाहेर काढले. त्यांना मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, परंतु डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले.

मालेगाव येथेच दोघांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले व दोघांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

या घटनेमुळे शहरातील मिल्लतनगर आणि चाळीसगाव रोडवरील हाजी मुल्ला नगरात शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

*