शिंदखेड्यासाठी ना.जयकुमार रावल विकासाचे ‘भगीरथ’

0
 
दोंडाईचा / शिंदखेडा शहर हे तालुक्याचे शहर असतांना याठिकाणी पूर्वी ब्रिटीशकालीन तहसिल कार्यालयाची पडकी इमारत होती.
नगरपंचायतीऐवजी येथे पुर्वी ग्रामपंचायत होती. रस्त्यावर धुळीचे साम्राज्य होते. पाणीप्रश्न गेल्या 30 वर्षापासून भेडसावत होता.
आदिवासी आणि दलित विद़यार्थ्यांना भाडयाच्या इमारतीत वसतीगृह होते. पंचायत समितीची इमारतदेखील तालुक्याला साजेल, अशी नव्हती. रेल्वे गेटवर अनेकदा प्रतिक्षा करावी लागत होती.अशा नानाविध समस्यांनी त्रस्त असलेल्या शिंदखेडा शहराचा गेल्या 7 ते 8 वर्षात मोठे बदल घडले आहेत.
त्यासाठी शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे रोहयो व पर्यटनमंत्री ना.जयकुमार रावल यांनी शिंदखेडा शहराचे रूप पालटण्याचा निर्धार केला.
यातून जवळपास 100 कोटींची विकासकामे मंजूर करून आणली. त्यातील बरीच कामे पूर्णदेखील झाली तर काही कामे प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे ना.जयकुमार रावल हे शिंदखेडा शहरासाठी भगीरथ ठरत आहेत.

आज ना.जयकुमार रावल यांच्या संघर्षातून उभी राहीलेल्या मध्यवर्ती प्रशासकिय इमारतीचा कामाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून त्यानिमीत्त शिंदखेडानगरी सजली आहे.

आघाडी सरकारच्या काळात धुळे आणि नंदूरबार जिल्हयातील सर्व तालुक्यातील प्रशासकिय इमारतीसाठी प्रत्येकी 2.40 कोटीचा निधी देण्यात आला.

फक्त शिंदखेडयात विरोधी पक्षाचे आमदार असल्याने आघाडी सरकारने शिंदखेडा तालुक्याच्या प्रशासकिय इमारतीला यातून वगळले होते. पंरतू अन्याय करणार्‍यांपैकी जयकुमार रावल नाहीत, हे त्यांनी आपल्या कामातून दाखवून दिले आहे.

हा विषय त्यांनी अनेकदा विधानसभेच्या अधिवेशनात उठवून तत्कालीन सरकारला नामोहरण केले. शेवटी इतर तालुक्यांपेक्षा दुप्पटीचा म्हणजे 5 कोटी 40 लाखाचा निधी शिंदखेडा शहराच्या प्रशासकिय इमारतीसाठी मंजूर करून आणले.

त्यातून आज धुळे आणि नंदूरबार जिल्हयातील सर्वात प्रशस्त अशी भव्यदिव्य इमारत उभी राहीली आहे, याशिवाय पोलिस स्टेशनलादेखील स्वतंत्र 60 लक्ष रूपयाची इमारत मंजूर करून स्वतंत्र पोलिस स्टेशन आज दिमाखात उभे आहे.

ग्रामपंचायतीला पाहिजे तेवढा निधी मिळत नसल्यामुळे शिंदखेडा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्यासाठी जो संघर्ष ना.जयकुमार रावल यांनी 2009 ते 2012 पर्यंत केला.

तो नक्कीच वाखाणण्याजोगा होता. तर पंचायत समितीला देखील अदयावत अशी इमारत उभी राहावी म्हणून त्यांनी जवळपास 3 कोटी रूपये मंजूर केले आहेत.

पंचायत समितीच्या इमारतीचेदेखील डिझाईन झाले असून त्याला नुकतीच तांत्रिक मान्यता प्रदान करण्यात आली आहे. शिंदखेडा शहराचा सर्वात प्रमुख प्रश्न पाणीटंचाईचा होता.

दरवेळी 8 महिने भीषण पाणीटंचाईचा सामना शिंदखेडेकरांना करावा लागत असे. पंरतू सुरवातीला तात्पुत्या योजनेसाठी 61 लक्ष नंतर कायमस्वरूपी योजनेसाठी 21 कोटीचा भरीव निधी मंजूर करून दिला आहे.

एवढेच नव्हे तर माळीवाडासह गाव भागातील नागरीकांना धुळयाकडे किंवा शिरपूरकडे जाण्यासाठी गावाला वळसा घालून 2 ते 3 कि.मी.चा फेरा करून जावे लागत होते.

म्हणून माळीवाडयाजवळ बुराई नदीवर स्वतंत्र पुलाच्या कामासाठी 5 कोटीचा भरीव निधी मंजूर करून दिला आहे. रेल्वे गेटमुळे नागरीकांना अनेकदा थांबावे लागत होते.

म्हणून रेल्वे उ़ड्डाणपुलालादेखील मंजूरी मिळवून आणली असून शहरात आगीमुळे नुकसान टाळण्यासाठी नविन अग्निशमन बंबदेखील मंजूर करून आणला आहे.

आदिवासी आणि दलित विद़यार्थ्यांना हक्काचे वसतीगृह व्हावे म्हणून जवळपास 8 कोटीच्या निधीतून फाईव्ह स्टार हॉटेलसारखे वसतीगृह शिंदखेडयाची शोभा वाढवित आहेत.

एवढेच नव्हे तर आपल्या आमदार निधीतून देखील शहरात कितीतरी कामे करून आपली छाप पर्यटन व रोहयो मंत्री जयकुमार रावल यांनी पाडली आहे.एकुणच गेल्या 7 ते 8 वर्षाच्या काळात शिंदखेडा शहराच्या सौदर्यांत भर टाकणार्‍या इमारती आणि विविध विकास कामांमुळे पर्यटनमंत्री जयकुमार रावल हे शिंदखेडा शहरासाठी भगीरथ ठरत असून येत्या काळात नगरपंचायतीसाठी स्वतंत्र इमारत, क्रिडा संकुल, भाजीमंडई अशी अनेक कामे त्यांच्या अजेंडयावर देखील आहेत.

LEAVE A REPLY

*