आयुक्तांच्या बंगल्यावर दगडफेक

0
धुळे / शहरातील देवपूर परिसरात मयुर कॉलनीत असलेल्या महापालिका आयुक्तांच्या बंगल्यावर अज्ञात व्यक्तींनी दि. 19 ला रात्री 11 वाजेच्या सुमारास दगडफेक केली.
दगडफेक करण्याचे कारण समजू शकले नाही. याबाबत देवपूर पोलिस ठाण्यात अज्ञात सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, शहरातील देवपूर परिसरात असलेल्या मयुर कॉलनीत महापालिका आयुक्त संगीता धायगुडे यांचा बंगला आहे.
या बंगल्यात दि.19 मे रोजी रात्री 11 वाजता श्रीमती धायगुडे या झोपलेल्या असतांना त्यांच्या घरावर अज्ञात पाच ते सहा जणांनी दगडफेक केली.

यावेळी बंगल्याचा रखवालदार छगन दगा धनगर हे ड्युटीवर होते. त्यांनी दगडफेक करणार्‍यांचा शोध घेतला पण ते सापडले नाहीत.

अज्ञात व्यक्तीने बंगल्याच्या पत्र्यावर दगडफेक केल्यामुळे पत्रा वाकून नुकसान झाले. दगडफेकीचे कारण समजू शकले नाही.

याबाबत बंगल्याचा रखवालदार छगन दगा धनगर यांनी देवपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 143, 426, 336, प्रॉपर्टी डॅमिज अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रात्री 11 वाजता छतावर दगड पडल्याचा आवाज आला. सुरूवातीला कशाचा आवाज आला असावा म्हणून दुर्लक्ष झाले.

मात्र जास्त आवाज येऊ लागल्याने त्यानंतर आयुक्त धायगुडे यांनी सुरक्षारक्षकाला बोलावले. वॉचमनने याबाबत खात्री केली.

पाहणी केल्यानंतर छतावर एक तर खाली तीन दगड पडल्याचे दिसून आले. मात्र दगड फेकणारे कोण होते? हे समजण्याच्या आतच अज्ञात व्यक्ती तेथून पसार झाल्या.

LEAVE A REPLY

*