कापडण्यात 28 ला गौरव सोहळ्याचे आयोजन

0
धुळे / संरक्षण राज्यमंत्री ना.डॉ.सुभाषजी भामरे, कापडणेचे सुपुत्र व नांदेडचे शिवसेनेचे आ. हेमंत पाटील(भामरे) व कापडणेचे सुपुत्र आणि पोलीस खात्याची नोकरी करताना राष्ट्रपती पुरस्काराचा सर्वोच्च सन्मान मिळालेले पोलीस उपायुक्त शांतीलाल अर्जुन भामरे या तीन मान्यवरांचा सत्कार व गौरव समारंभ आणि जाहीर सभेच्या कार्यक्रमाच्या नियोजनाकरिता उद्या (दि.21) कापडण्याच्या झेंडा चौकातील दत्त मंदिर येथे सायंकाळी 7.30 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीस गावातील आणि पंचक्रोशीतील तरुणांनी व मान्यवरांनी मोठ्या संख्यने उपस्थित रहावे, असे आवाहन भटू विश्राम पाटील व प्रा.रवींद्र पाटील यांनी केले आहे.

ना. डॉ.भामरे यांनी संरक्षण राज्यमंत्री पदावरुन बजावलेली मोलाची कामगिरी तसेच फौजी चंदु चव्हाण यांना सन्मानजनक भारतात परत आणल्याबद्दल, शिक्षणासाठी नांदेडला जाऊन शिवसेना पक्षाची जिल्हाप्रमुखाची जबाबदारी संभाळताना उद्योग, समाजकारण व राजकारणात स्वत:चा ठसा उमटवणारे आ. हेमंत पाटील(भामरे) आणि अठराविश्व दारिद्रयावर मात करत पोलीस खात्यातील पोलीस उपायुक्त पदापर्यंत मजल मारणारे आणि राष्ट्रपती पदक पुरस्कार प्राप्त करणारे शांतीलाल अर्जुन भामरे(मुंबई) या तिघांचा गौरव व सत्कार समारंभ कापडणा व पंचक्रोशीतर्फे दि.28 मे 2017 रोजी करण्यात येणार आहे.

या सत्काराच्या नियोजनासाठी उद्या (दि.21) बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास ना.जयकुमार रावल, ना.गुलाबराव पाटील, ना.दादाजी भुसे, ना.अर्जुन खोतकर, आ.किशोर पाटील, आ.अनिल कदम, औरंगाबाद जिल्हा परिषदच्या अध्यक्षा सौ.देवयानी कृष्णा पाटील डोणगांवकर या उपस्थित राहणार आहेत.

या नियोजनाच्या बैठकीला धुळे ग्रामीणचे माजी आमदार प्रा.शरद पाटील व रामकृष्ण खलाणे हे मार्गदर्शन करणार आहेत. ग्रामस्थांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भटू विश्राम पाटील व प्रा.रवींद्र पाटील यांनी केले आहे.

आपल्याच जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या तिन्ही मान्यवरांनी आपापल्या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करून जिल्ह्याचा नावलौकीक वाढविला आहे. त्यामुळे त्यांच्या सत्कार सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*