आग्रारोडवरील अतिक्रमण काढल !

0
धुळे / शहरातील आग्रारोडवर अडथळा निर्माण करणारे अतिक्रमणे आज महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाने काढली. यामुळे आग्रारोड मोकळा झाला आहे.
आग्रारोडवर अतिक्रमणे झाल्यामुळे या रस्त्यावर पायी चालणे देखील अवघड झाले होते. त्यामुळे या रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याबाबत महापालिका प्रशासनाकडे प्रचंड प्रमाणात तक्रारी आल्या होत्या.
त्यामुळे आज महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाने अडथळा निर्माण करणारी अतिक्रमणे काढली. यामुळे आग्रारोडने मोकळा श्वास घेतला आहे.

तत्कालीन आयुक्त डॉ. नामदेव भोसले यांनी शहरातील पाच कंदील चौक, आग्रारोडवरील अतिक्रमणे काढली होती. यामुळे या रस्त्यावरुन चारचाकी वाहनेही सहज जावू लागली होती तसेच व्यावसायीकही त्यांचा व्यवसाय सुरळीत करु शकत होते.

डॉ. भोसले यांनी रस्त्यावर अतिक्रमणे करु नये म्हणून फिरते पथक नियुक्त केले होते. परंतू त्यांच्या या कारवाईला प्रचंड प्रमाणात विरोध झाला.

त्यानंतर पुन्हा आग्रारोड जैसे थे झाला. डॉ. भोसले यांची बदली झाली त्यानंतर आयुक्त म्हणून संगीता धायगुडे या आल्या परंतू त्यांनी या प्रश्नाकडे पाठच फिरवलेली होती.

त्यामुळे आग्रारोडवरुन पायी चालणे देखील अवघड झाले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हातगाड्या लावल्या जात होत्या. पथारीवाले रस्त्याच्या मध्यभागी बसत होते.

आग्रारोड हा अतिक्रमणाने ग्रासला होता. आज अखेर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाने आग्रारोडवरील अतिक्रमणे काढली आहेत.

त्यांच्या या कारवाईचे शहरातून स्वागत झाले आहे. परंतू ही कारवाई केवळ फार्स राहू नये अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

*