सोनगीर ग्रामपंचायत कार्यालयात आपत्ती प्रशिक्षण

0

सोनगीर / जिल्हाधिकारी कार्यालय यांचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग व ग्रामसंजीवनी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने येथील ग्रामपंचायत कार्यालयात मंडळस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले.

अध्यक्षस्थानी मंडळ अधिकारी आर.बी. राजपूत उपस्थित होते.

आपत्तीचे प्रकार, त्याचे व्यवस्थापन, बचाव व मदतकार्य, पुनर्वसन, गावनिहाय संभाव्य आपत्ती जाणून घेत व्यवस्थापन आराखडा तयार करणे आदींबाबत दृकश्राव्य माध्यमातून माहिती देण्यात आली.

यावेळी बचाव व मदतीचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षक उमाकांत पाटील यांनी प्रथम सत्रात तर रुक्मिणी ओझा यांनी द्वितीय सत्रात मार्गदर्शन केले.

 

LEAVE A REPLY

*