घरफोडी करणारी टोळी गजाआड; मुद्देमाल जप्त

0
धुळे / शहरातील चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील तपास लावण्यात पोलिसांना अखेर यश आले असून सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने चार जणांना अटक केली.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या ताब्यातून चोरीचे पाच मोबाईल आणि एक मोटारसायकल असा एक लाख रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि हेमंत पाटील व डी.एन.खेडकर यांच्या पथकाने तपास केला.

चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात दि.27 मार्च रोजी घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता.

त्याचा तपास करीत असताना पोलिस पथकाने संशयित म्हणून अजय राजू शर्मा (वय 19), रा.रेल्वेस्टेशनरोड, धुळे, राहूल काशिनाथ शेलार (वय 21), रा.श्रीरामनगर, धुळे, सोनू उर्फ मोहन काशिनाथ सोनवणे (वय 17), रा.रेल्वेस्टेशनरोड, धुळे आणि आकाश उर्फ समाधान दगडू पवार (वय 17), रा.श्रीरामनगर, धुळे यांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून जप्त मुद्देमालामध्ये मोबाईल आणि मोटारसायकल (क्र.एमएच 18 एडी 6145) किंमत 50 हजार रुपये आदींचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

*