सामाजिक न्याय भवनाचे उद्घाटन होवू देणार नाही !

0

धुळे / डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनासाठी भिमशक्ती या संघटनेने सतत पाठपुरावा केला आहे. काँग्रेस पक्षाच्या काळात ही संकल्पना मांडली गेली आहे, परंतु आता भाजपाचे मुख्यमंत्री श्रेयासाठी उद्घाटनाला येत आहेत.

ही बाब दलित समाजावर अन्याय करणारी आहे. भवनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केले तर त्याला विरोध राहील. कार्यक्रम उधळून लावू, असा इशारा भिमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष कपिल दामोदर यांनी दिला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाचे उद्घाटन करणार आहेत. परंतु मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होवू देणार नाही असा इशारा भिमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष कपिल दामोदर यांनी दिला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनासाठी भिमशक्ती या सामाजिक संघटनेने सतत पाठपुरावे केलेले आहेत. ही संकल्पना काँग्रेसची सत्ता असतांना प्रत्येक जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन असावे यासाठी माजी सामाजिक न्यायमंत्री तथा भिमशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांची संकल्पना होती.

हे काँग्रेस पक्षाच्या काळात झालेले आहे. परंतू धुळे जिल्ह्यात काही पैशांच्या अभावी काम अपूर्ण होते. त्यासाठी भिमशक्तीचे धुळे जिल्हाध्यक्ष कपिल दामोदर यांनी सामाजिक न्यायमंत्री ना.राजकुमार बडोले यांची भेट घेवून निधी मंजूर करुन आणला व भिमशक्ती या सामाजिक संघटनेच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाचे उद्घाटन भिमशक्तीचे जिल्हाध्यक्ष कपिल दामोदर यांच्या हस्ते करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे उद्घाटन झालेले असतांना भाजपाचे मुख्यमंत्री श्रेयासाठी उद्घाटनाला येत आहेत ही बाब दलित समाजावर अन्याय करणारी आहे.

डॉ. आंबेडकर भवनाचे उद्घाटन ते करीत असतील तर त्यास विरोध आहे. असे झाल्यास भिमशक्ती या संघटनेच्यावतीने कार्यक्रम उधळून लावू.

जिल्हा पोलिस प्रशासनाने आम्हास अटक केली तरी दलित अनुयायी रस्त्यावर उतरुन कार्यक्रम उधळून लावल्याशिवाय राहणार नाहीत.

होणार्‍या घटनेत अनुचित प्रकार घडल्यास त्यास जिल्हा प्रशासन जबाबदार राहील याची जिल्हा प्रशासनाने नोंद घ्यावी असेही भिमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष कपिल दामोदार यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

LEAVE A REPLY

*