खान्देशी कलाकार भदाणे चित्रपट क्षेत्रात

0
धुळे / सांस्कृतीक क्षेत्रात खान्देशातील अनेक कलाकारांनी इतिहास घडवला आहे. यात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे तो साक्री तालुक्यातील सामोडे येथील भदाणे कुटुंबातील ललित प्रभाकर भदाणे याने !
ललित हा ‘आदित्य’ म्हणूनच जास्त ओळखला जातो. कारण झी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘जुळून येती रेशीम गाठी’ यात त्याने साकारलेला आदित्य घराघरात लोकप्रिय झाला आहे.

असा हा गुणी हरहुन्नरी कलावंत आता थेट ‘सैराट’ नंतर झी च्या बॅनरखाली बनत असलेल्या नवीन चित्रपटाद्वारे पडद्यावर झळकणार आहे.

चि.व चि.सौ.का. या झी च्या चित्रपटाचे दिग्दर्शक परेश मोकाशी असून निर्माते निखील साने आहेत. प्रमुख भूमिकेत ललित प्रभाकर भदाणे, मृन्मयी गोडबोले, भारत गणेशपुरे इत्यादी दिग्गज कलावंत आहेत.

ललितचा हा चि.व चि.सौ.का. हा चित्रपट येत्या 19 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

LEAVE A REPLY

*