जिल्हा प्रशासनाकडून मुख्यमंत्र्यांची दिशाभूल

0
धुळे / बुराई बारमाही योजनेबाबत प्रशासनाकडून चुकीची माहिती सादर करून मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करण्यात आली. यामुळे तालुक्याचे नुकसान जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे, असा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी केला आहे.
पत्रकात म्हटले आहे की, राज्याचे मुख्यमंत्री जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले असता जलयुक्त शिवार योजनेची आढावा बैठक शिंदखेड्याला घेतली गेली, ही गौरवाची बाब ठरली.
या संधीचा फायदा तालुक्यातील बुराई बारमाही योजनेच्या मंजुरीसाठी घेणे आवश्यक होते. परंतु जिल्हा प्रशासनाने बुराई बारमाही योजनेबाबत सर्व आलबेल असल्याचे चित्र मुख्यमंत्र्यांसमोर रंगविले.

बुराई नदीवरील 34 पैकी 24 बंधारे प्रस्तावित असून 10 बंधारे टेंडर प्रक्रियेत आहेत, अशी लेखी माहिती मुख्यमंत्र्यांच्या हातात देण्यात आली.

प्रत्यक्षात 24 बंधार्‍यांचे प्रशासकीय मान्यता आदेश दि.20 मार्च 2017 रोजी जलसंधारण मंत्री यांच्या बैठकीच्या संदर्भावरुन धुळे जिल्हाधिकारी यांनीच रद्द केलेली असतांना 24 बंधारे कुठल्या योजनेखाली प्रस्तावित केले आहेत,

याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी जाहीर करावे? रद्द केलेली प्रक्रिया बैठकीच्या समोर आली असती तर शिंदखेडा तालुक्यातील जनतेला मुख्यमंत्र्यांकडून काही भेट तरी मिळाली असती.

परंतु जिल्हाधिकार्‍याच्या नाकर्तेपणामुळे म्हणा किंवा सत्य बाहेर पडू नये अशा भिती बाळगणार्‍यांच्या आदेशामुळे वास्तविक चित्र समोर येवू नये, म्हणून यात ते यशस्वी झाले आहेत.

परंतु तालुक्याच्या हिताच्या प्रकल्पाबाबत तालुक्याच्या बैठकीतच नुकसान पाहण्यात धन्यता मानणारे बैठकीत शांत का? असाही प्रश्न शामकांत सनेर यांनी उपस्थित केला आहे.

बुराई बारमाही योजनेची मान्यता दि.10 मार्च रोजी जिल्हाधिकारी यांनी दिली. परंतु दि.16 मार्च रोजी सदर मान्यता शासन निर्णयानुसार नसल्यामुळे मान्यतेतील 24 बंधारे त्वरित रद्द करण्याच्या सुचना जलसंधारण मंत्री यांनी दिल्यात.

जिल्हाधिकार्‍यांनी 24 बंधार्‍यांची प्रशासकीय मान्यता रद्द केलेली आहे. सदर बंधार्‍याची मान्यता आता कुठल्या लेखाशिर्षकाखाली जिल्हा प्रशासनाकडून प्रस्तावित केलेली आहे व कधी प्रस्ताव पाठविण्यात आला.

त्याबाबतही जनतेला खुलासा करण्यात यावा? बुराई बारमाही योजनांची रद्द करण्यात आलेली प्रशासकीय मान्यता पुनश्च मिळावी, यासाठी तालुक्यात जनआंदोलन उभारले जाईल, असेही सनेर यांनी पत्रकात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*