फागणे येथे गावठाण जागेवर अनेकांचे अतिक्रमण

0
फागणे / गावठाण जागेची कमतरता असतांनाही अनेकांनी त्या यापूर्वीच बळकावून नावावर केल्या असल्याची धक्कादायक बाब फागणे ग्रा.पं.च्या नमुना नं. 8 वरुन निदर्शनास आली आहे.
या प्रकारात काही माजी सरपंच उपसरपंच ग्रा.पं. सदस्य आदींचाही समावेश असल्याचे लक्षात आले आहे. अधीच घरे-शेती नावावर असलेल्या तथाकथीत पुढारी व त्यांच्या नातेवाईकांची जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रांताधिकार्‍यांनी चौकशी करुन अशा बळकावलेल्या जागांबाबत कार्यवाही करावी व त्या ग्रामपंचायतीकडे वर्ग कराव्यात अशी मागणी सरपंचपुत्र बापू पाटील यांनी केली आहे.

सुमारे 15 ते 20 हजार लोकवस्तीच्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 वरील फागणे गावात अनेक अडचणी व समस्या उद्भवत असतात.

आधीच तीव्र पाणी टंचाई असलेल्या या गावात जिर्णावस्थेतील पाण्याच्या जलवाहिन्या व केव्हाही कोसळेल अशा जलकुंभामुळे डोकेदुखी वाढलेली आहे.

त्यातच विकासात्मक योजना राबविण्यासाठी व गरजू ग्रामस्थांना देण्यासाठी गावठाण जागेची कमालीची कमतरता भासत आहे. परंतू ज्यांच्या नावावर घरे, शेती आहेत, अशा व्यक्तींनी यापूर्वीच अशा जागा बळकावून त्या आपल्या नावावर करुन घेतल्या असल्याची बाब ग्रामपंचायतीतील नमूना नं. 8 या रजिष्टरवरुन लक्षात आली आहे.

विशेष म्हणजे या गावठाण जागा बळकावण्यात येथील काही माजी सरपंच, माजी उपसरपंच, सदस्य मंडळी तसेच त्यांच्या नातेवाईकांचा ही समावेश असल्याचे लक्षात आले आहे.

हा प्रकार सुमारे 15 ते 20 वर्षांपासून सुरु असून तथाकथीत पुढारी त्यांचे नातेवाईक आदींनी गरजू ग्रामस्थांवर एक प्रकारे हा अन्यायच केला असल्याने हा प्रकार संतापजनकच आहे.

वास्तविक पहाता अशा गावठाण जागा अनेक वर्षापासून गावात राहणार्‍या गरजू व दारिद्य्र रेषेखालील लोकांना मिळायला पाहिजे.

परंतू त्या जागा त्यांच्या नावावर न करता तथाकथीत या पुढार्‍यांनी घरे, शेती नावावर असतांनाही स्वत:च्या कुटुंबाच्या तसेच त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर करुन घेतल्याचे सरपंचपुत्र बापू पाटील यांना ग्रामपंचायतीच्या नमूना नं. 8 या रजिष्ट्ररवरुन लक्षात आले. असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

त्यांनी दिलेल्या पत्रकानुसार गावातील या गावठाण जागा गावात ज्यांना जेमतेम दोन-चार वर्ष राहण्यास झालेली आहेत. अशा व्यक्तींच्याही नावावर या जागा झालेल्या आहेत.

मात्र अनेक वर्षापासून राहणार्‍या गरजू व दारिद्य्र रेषेखालील व्यक्तींपासून वंचित आहेत. गावात विकासात्मक योजना राबविण्यासाठी आता गावठाण जागा शिल्लक राहिलेल्या नाहीत.

 

LEAVE A REPLY

*