26 जानेवारी 2018 पर्यंत जिल्हा हगणदारीमुक्त करा !

0
धुळे / जिल्ह्यात जलयुक्तची कामे उत्तम प्रकारे झाली आहेत. जास्तीत जास्त शेतकर्‍यांना शेततळे आणि विहिरी देण्यासाठी प्रयत्न करा. जलयुक्तची कामे अनेक वर्षापसाठीची गुंतवणूक ठरणार आहे.
त्याचबरोबर स्वच्छ भारत अभियानांतर्गत धुळे जिल्हा हागणदारीमुक्त होण्यासाठी प्रशासनाने एकजुटीने काम करुन 26 जानेवारी 2018 पर्यंत जिल्हा हागणदारीमुक्त होईल, अशी तयारी करावी.
कामांमध्ये गुणवत्ता ठेवा.तुम्ही केलेली कामे तपासण्यासाठी जानेवारीदरम्यान मी पुन्हा दोनवेळा आढावा घेण्यासाठी जिल्ह्यात येणार आहे.

त्यामुळे कोणतीही कमतरता ठेवू नका, अशा सूचना मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिल्या.

शिंदखेडा येथील नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतीत जिल्हा आढावा बैठक घेण्यात आली.

यावेळी पालकमंत्री ना.दादा भुसे, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे, पर्यटन व रोहयोमंत्री ना.जयकुमार रावल, राज्याचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रविणसिंह परदेशी, जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यावेळी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*