काँग्रेस जिल्हाध्यक्षांना केले स्थानबद्ध

0
धुळे / काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांच्यासह 10 ते 15 शेतकर्‍यांना पोलिसांनी चार ते पाच तास स्थानबध्द करुन ठेवले होते. दुपारी अडीच वाजेपासून रात्री 8.45 वाजेच्या सुमारास सनेर यांची सुटका करण्यात आली.
चिमठाण्यापासून जवळच असलेल्या दराणे फाट्यावर शामकांत सनेर हे काही शेतकर्‍यांसह उपस्थित होते. यावेळी चिमठाण्याकडून मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा शिंदखेड्याकडे जात असल्याने त्यापुढे असलेल्या वाहनातील पोलिसांना शंका आल्याने त्यांनी वाहन थांबविले.
चार-पाच वाहनांसह उपस्थित असलेले 15-20 शेतकरी आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांची चौकशी केली असता आंदोलनाच्या तयारीत असल्याचे पोलिसांना जाणवले.
त्यामुळे दु.2.28 मिनिटांनी पोलिसांनी शेतकर्‍यांसह सनेरांना ताब्यात घेतले. त्यानंतर शिंदखेडा पोलिस ठाण्यात नेण्यात आले. रात्री 8.45 वाजेपर्यंत सनेरांसह शेतकर्‍यांना बसवुन ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

 

LEAVE A REPLY

*