अंनिसची 21 रोजी उत्तर महाराष्ट्रस्तरीय बैठक

0
धुळे /  नशामुक्त महाराष्ट्रसाठी अंनिसची उत्तर महाराष्ट्रस्तरीय बैठक दि.21 मे रोजी सकाळी दहा वाजता भारत स्काऊट-गाईड कार्यालय येथे घेण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमधून दारुबंदी करण्यासंदर्भात मागणी होत आहे. अनेक गावांमध्ये महिलांच्या पुढाकाराने दारु दुकाने बंद करण्यात आली.
व्यसन या मानसिक आजाराच्या विरोधात प्रचार प्रबोधन करण्यासोबतच चला व्यसनाला बदनाम करुया, यासारखी मोहिम हाती घेतली आहे.

यासर्व परिस्थितीचा आढावा घेवून त्या संदर्भातील संवाद करुन धोरण व कृती कार्यक्रमाच्या आखणीसाठी 7 मे रोजी राज्यस्तरीय समन्वय चिंतन बैठक झाली.

त्यानंतर दि.21 मे रोजी उत्तर महाराष्ट्रस्तरीय बैठक सकाळी दहा वाजता भारत स्काऊट-गाईड कार्यालय येथे घेण्यात येणार आहे.

नशामुक्त महाराष्ट्रासाठी आव्हाने आहेत. त्यांची सोडवणूक करुन मार्ग व पध्दत शोधण्यासाठी बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.

बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र नशाबंदी मंडळाच्या राज्य सरचिटणीस वर्षा विद्या विलास आणि महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*