सार्वजनिक शौचालय पाडल्याप्रकरणी कारवाई करा !

0
धुळे  / रमाबाई आंबेडकर नगरमधील अतिक्रमण व सार्वजनिक शौचालय पाडल्याप्रकरणी अपर तहसीलदारांवर कारवाई करावी, अशी मागणी या परिसरातील रहिवाशांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हटले आहे की, सिटी सर्व्हे नं.13/अ-1 मधील रमाबाई आंबेडकर नगरातील रहिवासी 50 ते 60 वर्षांपासून अतिक्रमीत जागेवर वास्तव्य करीत आहेत.
हे सर्व लोकं परिस्थितीने अत्यंत गरीब असून मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करतात. 1982 साली घोषित झोपडपट्टी म्हणून हा परिसर जाहीर झाला आहे.
झोेपडपट्टीवासियांना अतिक्रमीत केलेल्या शासकीय जमिनी प्रदान करण्यात याव्यात, झोपडपट्टी नियमानुकूल करण्यात यावी, असे शासनाचे निर्देश असताना सदर जागेवरुन रहिवाशांना हुसकावून लावण्यात आले.

13 मे रोजी अपर तहसीलदार यांनी 40 सीटचे शौचालय पाडले. या प्रकरणी महापालिकेने दि.16 रोजी अपर तहसीलदारांवर गुन्हा दाखल करण्याचा ठराव केला आहे.

त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा व रहिवाशांना निवासासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*