शेतकर्‍यांच्या कर्जमुक्तीची वेळ कधी येणार?

0
धुळे / शेतकरी संघटनेतर्फे साळवे, ता.शिंदखेडा येथे मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याबाबत साकडे घालण्यात आले.
शेतकर्‍यांच्या कर्जमुक्तीची वेळ कधी येणार? असा सवाल निवेदनात उपस्थित करण्यात आला असून शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट कसे करणार, शेतीसाठी 12 तास विज कशी देणार, महाराष्ट्रात जीएम पिकांवर बंदी कशासाठी, गुजरातपेक्षा महाराष्ट्रात उसाचा दर दोन हजार प्रतिटन कमी कशासाठी, शरद जोशी हे तासपूरचे अध्यक्ष असताना त्यांनी केंद्र शासनाला अहवाल सादर केला होता.

त्यावर काय अंमलबजावणी झाली, सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर विकास कामांसाठी पैसे कुठून आणणार आणि कांदा, बटाटा खरोखर जीवनावश्यक वस्तू आहे का, असे सवाल करण्यात आले.

 

LEAVE A REPLY

*