धुळ्यात मुख्यमंत्रांच्या सभास्थळाला छावणीचे स्वरूप

0
धुळे | सभा उधळण्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रांच्या पांझरा नदी पात्रातील सभास्थळाला छावणीचे स्वरूप आले आहे. सभा निर्विघ्न पार पाडण्यासाठी पोलीस व जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. सभास्थळी येणारे सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

मुख्यमंत्रांची सभा उधळण्याचा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे तर सरकारमधील घटकपक्ष शिवसेनेने आंदोलनाचा इशारा दिल्याने मुख्यमंत्र्याच्या आजच्या सभेविषयी उत्कंठा वाढली आहे. मुख्यमंत्र्यांचे धुळ्यात आगमन झाले आहे, थोड्याच वेळात सभा सुरु होणार आहे.

सभेत कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रशासन कमालीचे सतर्क दिसते आहे. लहानपुलावरील वाहतूक थांबविण्यात आली आहे, गणपती मंदिरापासून लहान पुलाकडे येणारी वाहतूकही वळविण्यात आली आहे.

वाहन तळाची व्यवस्थाही लांब करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*