भारतीय मातेला सन्मान असल्याची बाब गौरवास्पद

0
शिरपूर / संपूर्ण जगभरात भारताची संस्कृती खूपच महान असून आपल्या देशात आईचे खूपच महत्व आहे.
जगभरात भारतीय मातेचे गुणगाण होते. अतिशय प्रतिकुल परिस्थितीत कुटुंबाला पुढे नेण्यासाठीसर्वच महिलांचे योगदान मोठे आहे.
अनेक मातांचे जीवन व त्यांचे कार्य आदर्शवत असून घरातील प्रत्येकाला सुसंस्कृत करण्यासाठी प्रत्येक माता घेत असलेले परिश्रम अतुलनीय आहे.

शिरपूर तालुक्यात आ.अमरिशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 35 वर्षांपासून सर्वसामान्यांच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत.

शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याने कुटुंबातील प्रत्येक मुलामुलीला उच्चशिक्षीत करावे असे आवाहन नगराध्यक्षा सौ.जयश्रीबेन पटेल यांनी केले.

जागतिक मातृदिनानिमित्त शिरपूर वरवाडे नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते एस.एम.पटेल ऑडीटोरी अमहॉल येथे आदर्शमाता सन्मान सोहळा संपन्न झाला.

शिरपूर शहर व तालुक्यातील 15 मातांचा आदर्श पुरस्कार देवून गौरविण्यात येवून यथोचित सन्मान करण्यात आला.

आईचे महत्व लक्षात घेवून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात अनेक महिला भावनाविवश झाल्याने नगराध्यक्षा सौ.जयश्रीबेन अमरिशभाई पटेल अश्रूंचा बांध फुटला.

 

LEAVE A REPLY

*