पिंपळनेर येथे भावंडांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

0
 
पिंपळनेर / पिंपळनेर शहरातील इंदिरा नगरात राहणार्‍या दोन्ही भावंडांना विजेचा धक्का लागल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेमुळे इंदिरानगरात शोककळा पसरली आहे. याबाबत पिंपळनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
एकाचवेळी दोन्ही भावंडांची अंत्ययात्रा काढण्यात येवून पिंपळनेर येथील वैकुंठधामात दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
याबाबत माहिती अशी की, पिंपळनेर येथील इंदिरा नगरात राहणार्‍या सौ. सुरेखाबाई कृष्णा सुर्यवंशी या रवींद्र (वय24) आणि सागर (वय22) यांच्यासह राहतात.
आज सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास सागर सुर्यवंशी हा त्याच्या घरी बाथरुममध्ये आंघोळीला गेला तेव्हा त्याला तेथे असलेल्या वीज वाहिनीचा धक्का लागला त्यामुळे तो जखमी झाला.
त्याला वाचविण्यासाठी त्याचा मोठाभाऊ रवींद्र हा गेला परंतू बाथरुममध्येच वीज पुरवठा उतरलेला होता. त्यामुळे रवींद्रही वीजेच्या धक्क्याने फेकला गेला.
दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. दोघा मुलांचा डोळे देखत मृत्यू झाल्यामुळे त्यांची आई सौ. सुरेखाबाईने एकच आक्रोश केला. त्यामुळे सुरेखाबाई यांच्या घराकडे ग्रामस्थ धावून आले.
रवींद्र आणि सागरचे शेकडो मित्र घटनास्थळी आले. दोघे भावंडे जग सोडून गेल्यामुळे त्यांच्या मित्रांनाही अश्रू आवरणे कठीण झाले.

सुरेखाबाई यांना रवींद्र आणि सागर यांचाच आधार होता ते दोघेजण घरातील कर्ते होते. घरातील कर्ता पुरुषच गेल्यामुळे सुरेखाबाई आज पोरक्या झाल्या आहेत.

रवींद्र आणि सागर यांचा मृतदेह पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. तेथे दोघांचा शवविच्छेदन करुन नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आले.

एकाचवेळी दोन्ही भावंडांची अंत्ययात्रा काढण्यात आली हे दृष्य बघून अनेकांचे डोळे पाणावले पिंपळनेर येथील वैकुंठ धामात दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

*