लोंबकळणार्‍या वीज तारांमुळे धोका

0
बळसाणे / बळसाणे व परिसरातील वीज खांवरील वीजतारा तारा जीर्ण झाल्या असून नागरिकांकरिता धोकादायक ठरत असून या गोष्टींकडे वीज कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. पावसाच्या अगोदर वीजेच्या जीर्ण झालेल्या तारा त्वरित बदलण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे
गावात वीजेच्या तारा काही ठिकाणी अगदी जवळच्या अंतरावरून गेल्या आहेत. शेतात व गावातील अशा जीर्ण झालेल्या तारांमुळे कदाचित अपघाताचा धोका पोहचू शकेल, असा अंदाज नागरिकांकडून केला जात आहे.
जोराचा वादळवारा आल्यावर जीर्ण झालेल्या तारा तुटून जमीनीवर पडतात. या कारणाने मोठी दुर्घटना होऊ शकते. वीज कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांचे याप्रकाराकडे सपशेल दुर्लक्ष होत आहे.

अशा गोष्टी ने वीजपुरवठा केंव्हाही खंडित होतो. काही वीजेचे पोल जुनाट व जीर्ण झालेले आहेत, वीज कंपनीने बळसाणेसह परिसरातील गावात जावून सर्वे करावा. धोकादायक वीज तारा तसेच पोल बदलण्याचे काम हाती घ्यावे व संभाव्य धोका टाळण्यात यावा.

पावसाळा तोंडावर असून गावोगावी वीज तारा अगदी झाडाच्या फांद्या जवळून गेल्या आहेत पावसाळ्यात वार्‍यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत वादळवार्‍याने झाडाच्या फांद्या तुटल्यास लगेच वीजपुरवठा खंडित होता.

LEAVE A REPLY

*