खा.संजय राऊत आज जिल्ह्यात

0

धुळे । दि.11 । प्रतिनिधी-शिवसेना नेते, खा.संजय राऊत हे दि.12 रोजी धुळे जिल्हा दौर्‍यावर येत असून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत धुळे जिल्ह्यातील विधानसभा निहाय आजी-माजी पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना, वाहतूक सेना, ग्राहक संरक्षण, विद्यार्थी सेना तसेच सर्व अंगीकृत संघटनांच्या पदाधिकार्‍यांना संघटनात्मक संघटना बांधणीवर व आगामी निवडणूकांसदर्भात मार्गदर्शन करणार आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आगामी सर्वच निवडणुकांची उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी जबाबदारी सोपवली आहे.

त्यानंतर त्यांचा पहिलाच धुळे जिल्हा दौरा असून त्यांच्या सोबत ग्रामविकास राज्यमंत्री तथा धुळे जिल्हा पालकमंत्री दादा भुसे, धुळे व नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांची उपस्थिती राहणार आहे.

शिवसेना नेते खा.संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत धुळे जिल्हा बैठका सकाळी 10 वाजता धुळे महानगर, 11 वाजता धुळे ग्रामीण, 12 वाजता साक्री तालूका दुपारी 3 वाजता शिंदखेडा तालूका ग्रामीण बैठक होईल.

LEAVE A REPLY

*