नॅशनल वर्कशॉपला आग ; लाखोंचे नुकसान

0
धुळे |  प्रतिनिधी :  शहरातील ऐंशीफूटी रोडवरील रहिवासी समसूद्दीन मिस्तरी यांच्या नॅशनल वर्कशॉपला अचानक आज दुपारी ३.२५ वाजता शार्टसर्किटने आग लागली. या वेल्डींग शॉपच्या बाजूला गुरांचा चारा असल्याने आगीने मोठा पेट घेतला होता.

समसुद्दीन मिस्तरी यांचे राहण्याचे ठिकाणही वरच्या मजल्यावर असल्याने आगीमुळे घरातील मौल्यवान साहित्य, जीवनावश्यक वस्तु व रोकड जळून खाक झाली. या आगीची माहिती कळताच मनपाचे अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

यात सुमारे २० ते २५ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

*