शेतकर्‍यांचे कर्ज माफ होणारच !

0
धुळे / ग्रामीण भागातला शेतकरी म्हणून मी राज्यातील गावागावांमध्ये जावून भेटी देत आहेत. शेतकर्‍यांच्या डोक्यात काय चालले आहे, हे जाणून घेत आहे. चिंता करु नका, हे सरकार तुमचे कर्ज माफ केल्याशिवाय राहणार नाही, असे आश्वासन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले.
धुळे तालुक्यातील बोरकुंड शिवारात भाजपाची आज शेतकरी संवाद यात्रा आयोजित करण्यात आली होती. यावेळी दानवे बोलत होते.

कार्यक्रमास केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना.डॉ. सुभाष भामरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल आदी उपस्थित होते.

दानवे पुढे म्हणाले की, मी गावाच्या सरपंच पदापासून आमदार, खासदार, मंत्री आणि आता प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहत आहे.

35 वर्षानंतर मला पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले आहे. या पदावर येण्यासाठी खूप गोष्टी पोटात साठवाव्या लागतात. मात्र काही लोक राजकारण करुन स्वार्थ साधतात. त्यांना कशात आणि किती रस आहे हे शेतकर्‍यांना समजले.

तिजोरीची चावी तुम्ही आमच्या ताब्यात दिली आम्ही तुमचे कर्ज माफ केल्याशिवाय राहणार नाही मात्र, शेतीत शाश्वत गुंतवणूक होणे आवश्यक आहे.

त्यासाठी मोदी सरकार आणि राज्य सरकार चांगले निर्णय घेत आहेत. 33 टक्के नुकसानीवर दुष्काळ जाहीर करतो. शेतकर्‍यांचा विमा आम्ही भरतो.

आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांना 2 रुपये किलो गहू आणि 3 रुपये किलो तांदुळ आम्ही देतो, मागेल त्याला विज कनेक्शन, शेततळे, विहिरी देण्याचे काम सरकारच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत. बांधबंदीस्तीसाठी मोठ्या प्रमाणावर कामे हाती घेतले आहेत.

जलयुक्त शिवारच्या माध्यमातून पाणी आणि माती आडविण्याचे काम सुरु आहे असेही दानवे म्हणाले. यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे, पर्यटनमंत्री ना. जयकुमार रावल यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी शेतकर्‍यांनी काही प्रश्न उपस्थित केले त्यास मान्यवरांनी उत्तरे दिली.

LEAVE A REPLY

*