विवाहसोहळ्यात अक्षदाऐवजी बियांचे वाटप

0
शिरपूर / शिरपूर येथील चित्रकार, कलाशिक्षक प्रल्हाद डी. सोनार व सौ. शोभा सोनार यांचा सुपुत्र चि. नागेश व शहादा येथील घनःश्याम भिक्कन जगताप व सौ. भारती जगताप यांची सुकन्या चि.सौ.कां. रविना यांचा शुभविवाह सोहळा वेगळ्या पद्धतीने झाला.
यावेळी अक्षतांएवजी वृक्ष लागवडीसाठी बियांचे वाटप करण्यात आले. वधु-वरांनीही एकमेकांना बिया वाटप केल्या
या समारंभात लग्नाला आलेल्या प्रत्येकाला वृक्षारोपणासाठी सात झाडांच्या बी देण्यात आल्या. वधू चि.सौ.कां. रविना व वर चि.नागेश यांनी सर्वांना आवाहन केले की, आम्ही आमच्या वैवाहिक आयुष्याची सुरूवात करीत आहोत.
आम्हाला भावी आयुष्यात आनंदाने जगण्यासाठी सावलीची गरज भासणार आहे आणि ती सावली तुम्ही आमच्यासाठी निर्माण करावी यासाठी आम्ही आपल्याला सिताफळ, गुलमोहर, आवळा, चिंच, बांबू, शिवण आणि पेल्टरो या झाडांच्या बी देत आहोत.

शक्य झाल्यास या बी तुमच्या घरातील लहान बालकांच्या शुभहस्ते रोपण करा. कारण सावलीची गरज त्यांनाही पडणार आहे. तुम्ही केलेल्या वृक्षारोपणाच्या माध्यमातूनच आपण आपला आशीर्वाद आम्हाला द्यावा ही नम्र विनंती!

या विवाह सोहळ्यात अनेक वैशिष्ठ्य अनुभवायला मिळाली. लग्न लागताना अक्षतांऐवजी टाळी लावणे याचा शब्दशः वापर केला गेला.

 

 

LEAVE A REPLY

*