हरित लवादाकडे तक्रार करणार

0
धुळे / मुख्यमंत्र्यांची सभा पांझरा नदीपात्रात होत आहे. त्यामुळे नदीच्या मुख्य प्रवाहाशी छेडछाड करुन मोठमोठे अवजड मशिनरीच्या सहाय्याने खोदकाम करण्यात येत आहे.
त्यासाठी पर्यावरण खात्याची परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे हरित लवादाकडे तक्रार करणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी दिली आहे.

पुढे बोलतांना मनोज मोरे म्हणाले की, मुख्यमंत्री ज्या विकास कामांच्या उद्घाटनासाठी येत आहेत, त्यातील बरीच कामे बेकायदेशीर आहेत.

त्यातील कामांना परवानग्या नाहीत. रस्त्यासाठी आवश्यक असलेली जलसिंचनाची, पर्यावरण खात्याची, मनपाची परवानगी घेतलेली नाही, असा आरोपही मनोज मोरे यांनी केला आहे.

 

LEAVE A REPLY

*