अपहरण करून मुलीवर बलात्कार; नराधमाला अटक

0
धुळे । दि.30 । प्रतिनिधी-लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचे वैद्यकीय तपासणीत पुढे आले. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान नराधमाला पिंपळनेर पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत माहिती अशी की, दापूरा ता. साक्री येथे राहणार्‍या 16 वर्षे सात महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शिवाजी भालचंद्र गायकवाड (वय 25 रा.शिरडोण) याने पळवून नेले.

त्यानंतर त्या मुलीशी शारिरीक संबंध प्रस्थापित केला. सदर मुलगी सापडल्यानंतर त्या मुलीचा वैद्यकीय तपासणी केली असता त्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचे वैद्यकीय तपासणीत पुढे आले.

याबाबत भादंवि 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु सदर मुलगी सापडल्यानंतर वाढीव कलम 376 (1), 366 (अ), 34 सह पोक्सो कायदा कलम 4 व 8 सह 3 (आय) (डब्ल्यू), (1) (2) लावण्यात आले आहेत. पिंपळनेर पोलिसांनी शिवाजी भालचंद्र गायकवाड याला अटक केली आहे.

 

 

LEAVE A REPLY

*