जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रस्त्यावरील खड्ड्यांच्या तक्रारी स्वीकारणार

0
धुळे । दि.30 । प्रतिनिधी-उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रस्त्यांवरील खड्डयांच्या तक्रारी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण स्वीकारणार आहे. या साठी स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरीष्ठस्तर जे. ए. शेख यांनी दिली आहे.
मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्डे व त्यांच्या दुरवस्थेबाबतच्या तक्रारी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या सचिवांकडून स्वीकारण्यात येणार आहेत.

मुंबई येथील उच्च न्यायालयाच्या जनहित याचिका क्र.71/2003 मध्ये संमत करण्यात आलेल्या आदेशानुसार रस्त्यावरील खड्डे आणि रस्त्याची दुरवस्था याबाबतच्या तक्रारी संदर्भात नोडल अधिकारी म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रस्त्यांवरील खड्डे आणि रस्त्याची दुरवस्था पाहता उच्च न्यायालयाने सर्वसामान्य जनतेस त्यांच्या तक्रारी संदर्भात दाद मिळावी यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे कक्ष स्थापन केला आहे.

धुळे महापालिका तसेच जिल्ह्यातील संबंधित नगरपालिका अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे व त्यांची दुरवस्था याबाबत तक्रारी असल्यास सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण दाखल कराव्यात, असे न्यायाधिश शेख यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

*