तांबापुरातील रहिवासी रात्रभर अंधारात

0
जळगाव । दि.28 । प्रतिनिधी – शहरातील तांबापूरा भागात विद्युत पुरवठा करणार्‍या शामाफायर गोडावून समोर असलेल्या डिपीतील कटआऊट अज्ञात इसमाने फोडले.
त्यामुळे तांबापूर परिसरातील विजगुल्ल झाल्याने या परिसरातील नागरीकांना रात्रभर अंधारात राहावे लागले. यात महाविरणचे सुमारे 3 हजाराचे नुकसान झाले असून पोलिसांनी एकास अटक केली आहे.

याबाबत महावितरणच्या अधिकार्‍यांकडून मिळालेली माहिती अशी की, तांबापूर भागात विद्युत पुरवठा करणार्‍या शामाफायरच्या गोडावून समोरील डिपीतील कटआऊट रात्री साडेअकराच्या सुमारास एका सुमारास फोडले.

त्यामुळे परिसरातील विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने या परिसरातील नागरीकांना रात्रभर अंधारात राहावे लागले. दरम्यान, परिसरातील नागरीकांनी वारंवार फोन करुन देखील महहावितरणच्या कर्मचार्‍यांकडून सकाळी 12 वाजेपर्यंत लाईट न आलेली नसल्याने व नागरीकांना रात्रभर अंधारात राहवे लागल्याने संताप व्यक्त करीत एमआयडीसी परिसरात असलेल्या महाविरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले.

यावेळी महाविरणच्या अभियंते बाविस्कर यांनी आंदोलकांची समजूत काढीत त्यांना रात्री घडलेल्या प्रकार सांगून नागरीकांची समजूत काढल्यानंतर आंदोलक माघारी परतले.

दरम्यान, याबाबात अभियंता बाविस्कर यांच्या फिर्यादिवरुन पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. पोलिसांनी कटआऊट फोडणार्‍या एका संशयीतास ताब्यात घेतले असल्याचे समजते.

 

LEAVE A REPLY

*